नवी दिल्ली : एक एप्रिलपासून 45 वर्षांपूर्वी सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. तसेच देशात लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून कोरोना लसीची कोणताही तुतवडा भासणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, "1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही आवाहन करतो की, सर्वांनी लगेच नोंदणी करावी आणि लसीकरण करुन घ्यावं."
दरम्यान, कोरोनानं पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं बोलंलं जात आहे. अशा परिस्थितीत राज्य आणि केंद्र सरकार कोरोनापासून कसा बचाव करता येईल यावर पूर्ण लक्ष देत आहे. त्यासाठी लस हा सर्वात उत्तम मार्ग असून सर्वांचं लसीकरण करणं आवश्यक असल्याचंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
पाहा व्हिडीओ : आता 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस घेता येणार
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच देशात आतापर्यंत 4.72 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयामार्फत जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एकूण 4,72,07,134 लोकांचं लसीकरण झालं आहे.
सोमवारी 45 वर्षांवरील 3,34,367 लाभार्थी जे गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत आणि 60 वर्षांवरील अधिक वयाच्या 13,07,614 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. तसेच 40,976 हेल्थकेयर आणि 72,153 फ्रंटलाइन वर्कर्सना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तर 44,728 हेल्थकेयर आणि 1,65,797 फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना वॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- कोरोना लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढवलं, केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स; Covishield Vaccine चा दुसरा डोस आता दोन महिन्यानंतर
- आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नावावर ड्रायव्हर, मोलकरणीला दिली लस, औरंगाबाद कोव्हिड लसीकरण मोहिमेत बनवाबनवी
- Covid Vaccine | कोणतीही लस घ्या, राजकारण कशासाठी? कोणती लस किती प्रभावी यावरून नवा वाद?