Covid Vaccine | कोणतीही लस घ्या, राजकारण कशासाठी? कोणती लस किती प्रभावी यावरून नवा वाद?
एबीपी माझा वेब टीम | 28 Jan 2021 11:57 PM (IST)
देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसीकरणानंतरही सरकार सतत जनतेला कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा न करण्याचं आवाहन करत आहे. अशातच सध्या देशातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट दिसत असून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी कोविड-19 संदर्भात एक नवी गाईडलाईन जारी केली आहे. या गाईडलाईन्समध्ये काही निर्बंधांवर सूट देण्यात आली आहे.