Covid-19 Cases LIVE : पुन्हा कोरोनाचं टेन्शन! जगात कोरोनाचा उद्रेक; कोरोना संदर्भातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

Coronavirus LIVE Updates : जगभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा कहर वाढताना दिसत आहे. यामुळे भारत सरकारही अलर्टवर आहे. कोरोना संदर्भातील प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 22 Dec 2022 06:01 PM
कोविड आढाव्या संदर्भातली राज्य सरकारची बैठक संपली

कोविड आढाव्या संदर्भातली राज्य सरकारची बैठक संपली. राज्यातील कोविड स्थितीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत आढावा घेतला. कोविड संदर्भातील टास्क फोर्स पुनर्गठीत करणार असल्याचं या बैठकीत ठरलं आहे. राज्यातील तज्ञ डॉक्टर आणि अधिकाऱ्यांची टास्क फोर्स असेल. थोड्याच वेळात याबद्दल आरोग्यमंत्री विधानसभेत देखील निवेदन करणार आहेत. जागतिक आणि राज्यातील स्थितीचा आणि सज्जतेचा आढावा घेण्यात आला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात

ओमायक्रॉनच्या नव्या सब व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक सुरु झाली आहे. देशभरात मास्कसक्ती लागण्याची शक्यता आहे. 

ओमायक्राॅनचा बीएफ ७ हा सब-व्हेरीयंट धोकादायक नसल्याचं सध्यातरी दिसतंय 

ओमायक्राॅनचा बीएफ ७ हा सब-व्हेरीयंट धोकादायक नसल्याचं सध्यातरी दिसतंय, असे डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जेजे रुग्णालय यांनी सांगितलं. 


चीनमध्ये वाढती रुग्णसंख्या याला त्यांची कोरोनासाठी तयार न झालेली रोगप्रतिकारक क्षमताच कारणीभूत 


याचं कारण चीननं कोव्हिडविरोधात कडक निर्बंध आखले होते. ज्यामुळे अनेकांचा कोव्हिडसोबत सामनाच झाला नाही आणि कोव्हिडविरोधातील रोग प्रतिकारक क्षमता तयार झाली नाही 


भारत कोव्हिडशी लढण्यात सक्षम, आपल्याकडील लसीकरण मोठ्या प्रमाणात पूर्ण आणि ओमायक्राॅनविरोधात आपण लढलो असल्यानं तसं काळजीचं कारण नाही 


लाट आल्यास आपण त्यासाठी देखील तयार आहोत. जेजे समुहातील जीटी रुग्णालय कोव्हिडसाठीच राखीव. मात्र, सध्या तिथं एकही रुग्ण नाही

Coronavirus Updates in India : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी

Coronavirus Updates in India : देशात सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये मोठी घट झाली आहे. दररोज नव्याने नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखी घटली आगे. देशात काल 112 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. काही महिन्यांपूर्वी दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा लाखांवर पोहोचला होता. आतापर्यंत देशात 4 कोटी 46 लाख 76 हजार 199 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील 4 कोटीहून अधिक रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.

Coronavirus : भारतात पुन्हा कोरोनाची लाट? डॉ. रवी गोडसे यांनी दिली महत्वाची माहिती

Coronavirus in India : जग पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. याशिवाय जपान, अमेरिका, ब्राझील आणि दक्षिण कोरियामध्येही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगासह भारतातही नागरिकांवर भीतीचं सावट आहे. मात्र कोरोनाच्या जगभरातील वाढत्या उद्रेकामुळे भारतीयांना घाबरण्याचं काही कारण नाही, असं डॉ. रवी गोडसे यांनी म्हटलं आहे. भारतात चीनप्रमाणे कोरोनाचा उद्रेक होणार नाही, असं मत रवी गोडसे यांनी व्यक्त केलं आहे. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

Coronavirus Updates : राज्यात गेल्या 24 तासांत 20 नवीन कोरोना रुग्ण

Maharashtra Corona Updates : राज्यात गेल्या 24 तासांत 20 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर संसर्गामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. महाराष्ट्रात सध्या 132 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. पुण्यामध्ये 48 तर मुंबईमध्ये 36 तर ठाण्यामध्ये 9 उपचाराधीन कोरोना रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 81,36,368 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 79,87,824 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून महाराष्ट्रात कोरोनामुळे एकूण 1,48,412 जणांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus Outbreak : पुन्हा मास्कसक्ती? केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या..

Bharati Pawar On Corona : चीनमध्ये (China) कोरोनाने (Corona) पुन्हा हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये कोविड रुग्णांची (Covid) संख्या अचानक वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात (India) उद्रेक होऊ नये. यासाठी आज केंद्रीय स्तरावर महत्वाची बैठक पार पडणार आहे. तसेच भारतात पुन्हा मास्क बंधनकारक (Mask Compulsory) करण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी सांगितलंय. 

Coronavirus : जगभरात एका आठवड्यात 36 लाखांहून अधिक रुग्ण; चीनसह ब्राझील आणि जपानमध्ये वाढते रुग्ण

Corona Virus Updates : जगभरात कोरोना विषाणू संसर्गाचा (Corona Virus) वेग प्रचंड वाढला आहे. एका आठवड्यात जगभरात 36 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. चीनसह ब्राझील आणि जपानमध्ये वाढते रुग्ण कोरोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानसह ब्राझीलमध्येही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. चीनमध्ये मोठ्या कोरोना रुग्ण आढळत असून अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागोमाग जपान आणि दक्षिण कोरियामध्येही कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे.

Coronavirus : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय, कोरोना नमुन्यांचं जीनोम सीक्वेन्सिंग होणार

Maharashtra Govt on Genome Sequencing : महाराष्ट्र सरकार आता कोरोना नमुन्यांच्या जीनोम सीक्वेन्सिंग (Genome Sequencing) करणार आहे. केंद्र सरकारच्या (Central Government) सूचनेनुसार राज्य सरकारने (Maharashtra Government)  हा निर्णय घेतला आहे. जगभरातील वाढता कोरोना संसर्ग (Coronavirsu Outbreak) पाहता केंद्रांना राज्यांना जीनोम सीक्वेंसिंग करण्याच्या मार्गदर्शन सूचना केल्या होत्या. या सूचना गांभीर्याने घेत राज्य सरकारने नमुन्यांचं जीनोम सीक्वेन्सिंग करण्याचा निर्णय घेतला असून नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.

Corona Updates : कोरोनाशी दोन हात करण्याची भारत सरकारची तयारी

जगातील कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता भारत सरकारने उपायजोना करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रांना राज्यांना जीनोम सीक्वेंसिंग करण्याच्या मार्गदर्शन सूचना केल्या आहेत. यामुळे कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरियंटबाबत अधिक माहिती मिळेल आणि या व्हेरियंटला थोपण्यासाठी प्रयत्न केले जातील. देशात कोविड निर्बंध लागू होण्याचीही शक्यता आहे.

Mumbai Corona Cases : मुंबईमध्ये सात नवे रुग्ण

Maharashtra Corona Updates : मुंबईमध्ये गेल्या 24 तासांत सात नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. पुण्यामध्ये सहा आणि औरंगाबादमध्ये एक नवीन रुग्ण आढळला आहे. तर नागपूर, लातूर आणि अकोल्यामध्येही प्रत्येकी दोन रुग्ण सापडले आहेत.

Maharashtra Corona Updates : महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती काय?

Covid-19 Updates : राज्यात गेल्या 24 तासांत 20 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर संसर्गामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. महाराष्ट्रात सध्या 132 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. पुण्यामध्ये 48 तर मुंबईमध्ये 36 तर ठाण्यामध्ये 9 उपचाराधीन कोरोना रुग्ण आहेत. 

India Coronavirus Updates : देशात पुन्हा कोरोना निर्बंध?

Coronavirus Updates in India : केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज देशातंर्गत कोविड तयारीबाबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे.  नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होऊ शकतात. असं झाल्यास नवे निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.

China Corona Updates : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर

China Coronavirus Outbreak : कोरोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने  (Covid-19) डोकं वर काढलं आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. चीनमधील कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असून रुग्णालयात खाटा आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. चीनमधील बीजिंग, शांघाय, वुहान, ग्वांगझाऊ, झेंगझोऊ, चोंगकिंग आणि चेंगडू या शहरांमध्ये परिस्थिती अधिक भयावह होत आहे. कोरोनाची वाढती संख्या पाहता चीनमध्ये कोरोनामुळे मृतांचा आकडा लाखांवर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Adar Poonawalla on Corona : घाबरु नका, मार्गदर्शक सूचनांचं पालन करा : अदर पूनावाला

Coronavirus Updates : जगभरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही जगाच्या चिंतेचा विषय बनला आहे. चीनमधील कोविड उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक आणि सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी भाष्य करत भारतीयांना न घाबरण्याचा सल्ला दिला आहे. भारताची उत्कृष्ट लसीकरण मोहीम आणि ट्रॅक रेकॉर्डमुळे घाबरण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं. सोबतच मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन देखील केलं. याबाबत पूनावाला यांनी ट्वीट केलं आहे.

Coronavirus Updates in India : आज केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक

India Coronavirus Updates : जगभरात कोरोनाचा ( Covid19 Virus ) पुन्हा एकदा उद्रेक पाहायला मिळत आहे. चीन ( China ), ब्राझीलमध्ये ( Brazil ) पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. जगभरातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग पाहता भारत सरकार (Government of India ) अलर्ट झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज देशातंर्गत कोविड तयारीबाबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे देशात कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पार्श्वभूमी

Coronavirus Updates : जगभरात कोरोना विषाणू संसर्गाचा वेग प्रचंड वाढला आहे. कोरोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्यो पुन्हा एकदा कोरोना विस्फोट झाला आहे. अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानसह ब्राझीलमध्येही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. चीनमध्ये मोठ्या कोरोना रुग्ण आढळत असून अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामागोमाग जपान आणि दक्षिण कोरियामध्येही कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे.


जगभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा कहर


जगभरातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, प्रशासन अलर्टवर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विषाणूच्या नवीन स्वरूपाचे निरीक्षण करण्यासाठी संक्रमित आढळलेल्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेंसिंग वाढविण्याचे आवाहन केले. याआधी मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोनाच्या नवीन प्रकारांचे निरीक्षण करण्यासाठी संक्रमितांमध्ये आढळलेल्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेंसिंग वाढविण्याचे आवाहन केले होते.


चीनमध्ये कोविड रुग्णांची (Covid) संख्या अचानक वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात (India) उद्रेक होऊ नये. यासाठी आज केंद्रीय स्तरावर महत्वाची बैठक पार पडणार आहे. तसेच भारतात पुन्हा मास्क बंधनकारक (Mask Compulsory) करण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी सांगितलंय. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या


"बैठकी दरम्यान होणार महत्वाचे निर्णय" 
आज होणाऱ्या बैठकीत वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार आहे, तसेच या बैठकी दरम्यान काही महत्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती डॉ. भारती पवार यांनी दिली आहे. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, भारत अलर्ट मोडवर असून पवार यांनी नागरिकांसाठी काही खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत. काय म्हणाल्या भारती पवार?


कोरोना विषाणूंमुळे (Coronavirus) पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. चीनसह (China), अमेरिका (America), ब्राझील (Brazil) आणि जपानमध्येही (Japan) कोरोना विषाणूचा वेगाने फैलाव होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अशात भारतामध्ये मात्र कोरोनाची सध्याची परिस्थिती सामान्य आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांमध्ये 131 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.


घाबरु नका, मार्गदर्शक सूचनांचं पालन करा : अदर पूनावाला


जगभरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही जगाच्या चिंतेचा विषय बनला आहे. चीनमधील कोविड उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक आणि सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी भाष्य करत भारतीयांना न घाबरण्याचा सल्ला दिला आहे. भारताची उत्कृष्ट लसीकरण मोहीम आणि ट्रॅक रेकॉर्डमुळे घाबरण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं. सोबतच मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन देखील केलं. याबाबत पूनावाला यांनी ट्वीट केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.