COVID-19: चीनमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट झालं आहे. आज केंद्रानं सर्व राज्यांना कोरोना महामारी संदर्भात निर्देश दिले आहेत. कोरोनाच्या वाढता धोका पाहता विदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियमावलीही जारी केली आहे. त्यासह केंद्र सरकारनं कोणत्याही परिस्थितीशी लढण्यास तयार असल्याचं आपल्या निर्देशात म्हटलेय. 


आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MoHFW) ऑक्सिजनच्या पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहले आहे. रुग्णालयामध्ये मुबलक प्रमाणात ऑक्सिजन, ऑक्सीजन सिलेंडर आणि वेंटिलेटर यासारख्या जीवनावश्यक उपकराणांची उपलब्धता सुनिश्चित करा, असे पत्रात राज्यांना निर्देश दिले आहेत. यासह, प्रेशर स्विंग ऍडसॉर्प्शन (पीएसए) ऑक्सिजन उत्पादन संयंत्रे पूर्णपणे कार्यरत ठेवावीत. तसेच त्याची तपासणी करण्यासाठी नियमित मॉक ड्रिल केले जावे, असेही पत्रात म्हटलेय. 


आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अगनानी यांनी सर्व राज्यांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, 'कोणत्याही परिस्थितीशी लढण्यासाठी सर्व आरोग्य सुविधा आणि त्याची स्थिती चांगली असणं गरजेचं आहे. त्याची देखभाल वारंवार केली जाणं महत्वाचं आहे. सध्या देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, पण आपण सतर्क राहिला हवं. '


परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य - 


केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना आरटी पीसीआर चाचणी अनिवार्य केल्याची माहिती आज दिली. ते म्हणाले की,  चीन, सिंगापूर, जापान आणि थायलँडमधून येणाऱ्या प्रवाशांवर 'एयर सुविधा' पोर्टलच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली आहे. त्यासोबतच  चीन, दक्षिण कोरिया, जापान, बँकॉक आणि सिंगापूर येथून येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच विमानतळावर प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. 


कोरोनाबाबत महत्वाच्या 10 अपडेट -


चीन, सिंगापूर, जापान आणि थायलँड येथून येणाऱ्या प्रवाशांवर 'एयर सुविधा' पोर्टलच्या माध्यामातून लक्ष असेल.  


चीन, दक्षिण कोरिया, जापान, बँकॉक आणि सिंगापूर येथून येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर (RT-PCR) रिपोर्ट आधीच अपलोड करावा लागेल. 


भारतात येणाऱ्या प्रवाशांचं विमानतळावर थर्मल स्क्रीनिंग केलं जाणार


विदेशी प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळल्यास अथवा पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना क्वारंटाईन केलं जाईल. 


 ऑक्सिजन, ऑक्सिजन सिलेंडर आणि वेंटिलर यासारख्या सुविधा रुग्णणालयात मुबलक प्रमाणात आहेत का? याची पडताळी केली जाईल. 


प्रेशर स्विंग ऍडसॉर्प्शन (पीएसए) ऑक्सिजन उत्पादन संयंत्रे पूर्णपणे कार्यरत ठेवावीत. तसेच त्याची तपासणी करण्यासाठी नियमित मॉक ड्रिल केले जाईल.  


कोरोनाच्या उद्रेकामुळे जगभरात चिंता वाढली आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या या चेतावणीनंतर केंद्र सरकार अलर्ट झालं आहे. 


मागील 24 तासांत भारतामध्ये 201 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 


देशातील सक्रिय रुग्णांची संख्या तीन हजार 397 झाली आहे, शुक्रवारच्या तुलनेत यामध्ये किंचित वाढ दिसली आहे.


मागील 24 तासांत देशभरात 183 रुग्णांनी कोरोनावर मात केली. यादरम्यान एक लाखांपेक्षा जास्त लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे.