CBSE Board Exam Date Sheet 2023: लवकरच सीबीएसई बोर्डाकडून (CBSE Exams) दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांची डेट शीट जाहीर केली जाणार आहे. यावर्षी सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी वर्गासाठी सुमारे 34 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सर्व विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरून बोर्ड परीक्षेची डेट शीट डाऊनलोड करू शकतील. अहवालानुसार, सीबीएसई बोर्ड दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी कधीही डेटशीट जारी करू शकतं. 


1 जानेवारीपासून इयत्ता दहावी आणि बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा सुरू होणार आहेत. याशिवाय 15 फेब्रुवारीपासून बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. दरम्यान, सीबीएसईनं अद्याप डेटशीट जारी केलेली नाही. यावेळी सीबीएसई बोर्ड एकाच टर्ममध्ये परीक्षा घेणार आहे. बोर्डानं काही दिवसांपूर्वीच इंटरनल एग्जाम आणि प्रॅक्टिकल एग्जामसाठी गाईडलाईन्स जारी केल्या होत्या. सीबीएसईनं यावर्षी झालेल्या बोर्ड परीक्षांचे निकाल 22 जुलै रोजी जाहीर केले आहेत. सीबीएसई दहावीच्या बोर्ड परीक्षेत यंदा एकूण 94.40 टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविलं आहे. तर बारावीत 92.71 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.


सीबीएसई बोर्डाची डेट शीट कशी कराल डाऊनलोड? 



  • सर्वात आधी CBSE ची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in ला भेट द्या. 

  • यानंतर होमपेजवरील 'मेन वेबसाईट' या पर्यायावर क्लिक करा.

  • त्यानंतर विद्यार्थ्यासमोर 'CBSE Class 10 Date Sheet 2023' आणि 'CBSE Class 12 Date Sheet 2023' चा पर्याय दिसेल.

  • विद्यार्थ्यांनी आपल्या इयत्तेनुसार डेटशीटच्या लिंकवर क्लिक करा.

  • त्यानंतर विद्यार्थी डेट शीट डाऊनलोड करू शकतात. 

  • डेट शीट डाऊनलोड झाल्यानंतर प्रिंट आऊट काढा. 


दोन टर्ममध्ये नाहीतर, यावेळी CBCE परीक्षा एकाच वेळी 


गेल्या वर्षी सीबीएसईनं परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या होत्या. यंदा मात्र तसं होणार नसून परीक्षा एकाच टर्ममध्ये घेतली जाणार आहे. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे सीबीएसईनं परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टर्मच्या परीक्षेचं आयोजन गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये करण्यात आलं होतं. तर टर्म-2 ची परीक्षा 26 एप्रिलपासून सुरू झाली होती. यावर्षी सीबीएसईनं 22 जुलै रोजी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला. इयत्ता बारावी मध्ये एकूण 92.71 टक्के तर दहावी मध्ये 94.40 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.


यंदा 15 फेब्रुवारीपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा 


दरम्यान, सध्या देशासह जगात कोरोना प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना प्रादुर्भावात झालेली घट लक्षात घेता,  CBSE ने 15 फेब्रुवारी 2023 पासून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे, यंदा परीक्षा एकाच टर्ममध्ये घेतली जाणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


CBSE Board Exam 2023 : यंदा सीबीएसई बोर्ड परीक्षा 15 फेब्रुवारीपासून; वेळापत्रक डिसेंबरमध्ये प्रसिद्ध होणार


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI