येडियुरप्पा यांचा राजीनामा : नवी दिल्ली : "पंतप्रधान भ्रष्टाचारविरोधी भाषा बोलतात, पण खरंतर तेच भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत आहेत. मला मोदींना सांगायचंय की पंतप्रधान देश, सुप्रीम कोर्ट, जनता आणि लोकशाहीपेक्षा नसतो," अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
कर्नाटकमध्ये बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि भाजप सरकार अवघ्या अडीच दिवसात कोसळलं. यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएस आघाडीचं सरकार बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकात लोकशाहीचा विजय झाल्याचं सांगितलं.
शपथविधी ते येडियुरप्पांचा राजीनामा, 55 तासात नेमकं काय घडलं?
भाजपने राष्ट्रगीताचा अपमान केला!
राहुल गांधी म्हणाले की, "कर्नाटक विधानसभेत भाजप आमदार आणि हंगामी अध्यक्षांनी राष्ट्रगीताचा अपमान केला. राष्ट्रगीताआधीच त्यांनी सभागृह सोडलं. ते प्रत्येक गोष्टीचा अपमान करतात. भाजपचा स्वभावच असा आहे. ते विधानसभा, सुप्रीम कोर्ट, प्रत्येक संस्थेचा अपमान करतात. त्यांनी गोव्यातील जनाधाराचा, मणिपूरच्या जनमताचा अपमान केला. कर्नाटकच्या जनमताचाही अपमान त्यांनी केला."
पंतप्रधान देश, जनतेपेक्षा मोठा नाही
पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान देश, सुप्रीम कोर्ट, जनता आणि लोकशाहीपेक्षा मोठा नसतो. मोदींनी संस्थांचा सन्मान करावा.
येडियुरप्पांचा राजीनामा, कर्नाटकात भाजपचं सरकार कोसळलं
मोदीच भ्रष्टाचार आहेत!
राहुल गांधीनी पंतप्रधान मोदींवर भ्रष्टाचाराचाही आरोप केला. "पंतप्रधान, अमित शाह यांनी काँग्रेस आणि जेडीएस आमदारांच्या खरेदीला मंजुरी दिली. पंतप्रधान सांगतात की, ते भ्रष्टाचाराशी लढत आहेत. पण प्रत्यक्षातच तेच भ्रष्टाचार आहेत. फोनवर झालेली बातचीत आम्ही सार्वजनिक केली. देशातील प्रत्येक संस्था झुकवू शकतो, उद्ध्वस्त करु शकतो, असं त्यांना वाटलं. पण भारतात सत्ता सर्वकाही नाही, लोकांची इच्छाशक्ती सर्व आहे," असं काँग्रेस अध्यक्षांनी सांगितलं.
विरोधक भाजपला पराभूत करतील
"पंतप्रधानांचं मॉडेल लोकशाहीचं नाही तर हुकुमशाहीचं आहे. मात्र विरोधक एकत्र येऊन भाजपला पराभूत करतील. काँग्रेस या देशाच्या संस्था आणि जनतेच्या आवाजाची सुरक्षा करेल," असा दावा राहुल गांधींनी केला.
संबंधित बातम्या
येडियुरप्पा देशातील सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री
फडणवीसांनाही सिद्ध करावं लागलं होतं बहुमत, राष्ट्रवादी मदतीला धावली होती!
पंतप्रधान मोदी म्हणजेच भ्रष्टाचार : राहुल गांधी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 May 2018 05:51 PM (IST)
येडियुरप्पा यांचा राजीनामा : कर्नाटकमध्ये बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि भाजप सरकार अवघ्या अडीच दिवसात कोसळलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -