दरम्यान, येडियुरप्पा यांच्या मुलाने काँग्रेस आमदाराच्या पत्नीला फोन करुन 15 कोटींची ऑफर दिली, असाही आरोप करण्यात आला आहे. याची ऑडिओ क्लिप काँग्रेसने जारी केली.
याचदरम्यान, भाजप नेते जनार्दन रेड्डी यांचीही ऑडिओ क्लिप जारी करण्यात आली. त्यांनी काँग्रेसच्या आमदारांना ऑफर दिल्याचा दावा आहे. भाजपचे सोमसेखर रेड्डी काँग्रेसच्या दोन आमदारांसोबत असल्याचीही माहिती आहे. रेड्डी बंधूंच्या ताब्यात काँग्रेसचे पाच आमदार असल्याचं बोललं जात आहे.
काँग्रेसचे आमदार आनंद सिंह आणि प्रताप पाटील गौडा फिंच हॉटेलमध्ये आढळून आले. आज 4 वाजता कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. त्यापूर्वी आमदारांचा शपथविधी झाला. विधानसभेचं कामकाज दुपारी 3.30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. शिवाय भाजपने तातडीची बैठकही बोलावली आहे.
संबंधित बातम्या :