मुंबई : देशातील कोरोनाबाधितांची संख्या 5 लाखांवर गेली आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली असून 24 तासात कोरोनाबाधितांची संख्या 18 हजार 552 ने वाढली आहे तर मृतांचा आकडा 384 ने वाढला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 लाख 8 हजार 953 वर पोहोचला आहे.
त्यापैकी एकूण 2 लाख 95 हजार 881 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 58.13 टक्के इतका आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 97 हजार 337 इतके आहेत. गेल्या 24 तासांत 10 हजार 244 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात एकूण मृतांची संख्या 15 हजार 685 वर पोहोचली आहे. कालअखेर देशात 79 लाख 96 हजार 707 चाचण्या झाल्या आहेत. काल (25 जून) देशात 2 लाख 20 हजार 479 चाचण्या झाल्या.
महाराष्ट्रात देखील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात काल एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल 5 हजार 24 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. परवा 4 हजार 841 रुग्णांची नोंद झाली होती. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दीड लाखांच्या पार गेली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 52 हजार 765 वर पोहोचली आहे. यापैकी 79 हजार 815 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 65 हजार 829 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
जगभरात कोरोनाचा कहर सुरुच
जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 99 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 9,925,777 लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 497,344 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 5,375,129 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 62 टक्के कोरोनाबाधित हे केवळ 8 देशांमध्येच आहेत.
कोणत्या देशात किती कोरोनाबाधित
अमेरिका: कोरोनाबाधित - 25,52,956; मृत्यू- 1,27,640
ब्राझिल: कोरोनाबाधित - 12,80,054; मृत्यू- 56,109
रशिया: कोरोनाबाधित - 6,20,794; मृत्यू- 8,781
भारत: कोरोनाबाधित - 5,09,446; मृत्यू- 15,689
यूके: कोरोनाबाधित - 3,09,360; मृत्यू- 43,414
स्पेन: कोरोनाबाधित - 2,94,985; मृत्यू- 28,338
पेरू: कोरोनाबाधित - 2,72,36; मृत्यू- 8,939
चिली: कोरोनाबाधित - 2,63,360; मृत्यू- 5,068
इटली: कोरोनाबाधित - 2,39,961; मृत्यू- 34,708
इराण: कोरोनाबाधित - 2,17,724; मृत्यू- 10,239
देशातील कोरोनाबाधितांची संख्या 5 लाखांवर, तर जगभरात आकडा एक कोटींच्या जवळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jun 2020 03:07 PM (IST)
देशातील कोरोनाबाधितांची संख्या 5 लाखांवर, गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वाधिक 18 हजार 552 ची वाढ झाली आहे. जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 99 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत.
सांकेतिक छायाचित्र
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -