नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत देशात 941 जणांना कोरोना व्हायरसमुळे लागण झाली आहे आणि 37 लोक मरण पावले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सायंकाळी चारच्या सुमारास ही माहिती दिली. मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, आतापर्यंत देशातील 325 जिल्ह्यात कोरोना व्हायरसची लागण झालेली नाही.
देशात आतापर्यंत 12,380 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 414 जणांचा मृत्यू झाला असून 1489 जण बरे झाले आहे. अगरवाल म्हणाले, आतापर्यंत 2, 90, 401 नागरिकांची COVID-19 टेस्ट करण्यात आली आहे. बुधवारी (15 एप्रिल ) 30, 043 टेस्ट करण्यात आल्या आहे.
पाच लाख नवी रॅपिड टेस्ट किट देशात आले आहेत. परंतु, त्याचा वापर सुरुवातीच्या चाचणीसाठी केला जात नाही. याचा वापर निगराणीसाठी केला जातो. हॉटस्पॉट परिसरातील ट्रेंड पाहण्यासाठी याचा वापर होईल. देशातल्या 325 जिल्ह्यांमध्ये करोनाचा शिरकाव झालेला नाही अशी माहिती आज आरोग्य मंत्रालयाने दिली. तसंच ज्या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे त्या ठिकाणी काय उपाययोजना करायच्या याबाबत WHO शी चर्चा झाल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजण्यात येत आहेत. एवढंच नाही तर WHO सोबतही चर्चा झाल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. देशात लॉकडाउनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीत आम्हाला उपाय योजना करण्यासाठी अवधी मिळेल असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.
Coronavirus | पिंपरी चिंचवडमध्ये 4 नवे कोरोना बाधित; चार वर्षांच्या चिमुकलीलाही कोरोनाची लागण