वॉशिंग्टन : संपूर्ण जग कोरोना व्हायरसपुढे हतबल झालं असतानाच देशातही कोरोना व्हायरस फोफावत चालला आहे. अशातच कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनाकडून अनेक उपाय योजना राबवण्यात येत आहेत. तसेच या उपाययोजनांसाठी मदत करण्याचं आवाहनही देशातील नागरिकांना करण्यात येत आहे. अशातच कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी वर्ल्ड बँकेने भारताला एक अब्ज डॉलरच्या आपत्कालीन अर्थ सहाय्यता निधीसाठी मंजुरी दिली आहे.  (1 अब्ज = 100 कोटी, 1 डॉलर = 75 रूपये / म्हणजेच, 75 x 100 = 7500 कोटी) वर्ल्ड बँकेच्या सहाय्यता योजनेतून 1.9 अब्ज डॉलरच्या पहिल्या टप्प्यात जगभरातील 25 देशांची मदत केली जाणार आहे. तसेच, 40 पेक्षा जास्त देशांमध्ये नवीन उपक्रमांची आखणी करण्यात येणार आहे.



वर्ल्ड बँकेकडून देण्यात येणाऱ्या आपत्कालीन अर्थ सहाय्यता निधीतून सर्वाधिक निधी म्हणजेच, एक अब्ज भारताला देण्यात येणार आहे. वर्ल्ड बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाने जगभरातील विकसनशील देशांसाठी आपत्कालीन सहाय्यता योजनेच्या पहिल्या टप्प्यात मंजुरी दिली आहे. यावेळी बोलताना सांगितले की, 'भारतात एक अब्ज डॉलरच्या आपत्कालीन अर्थ सहाय्यता निधीतून कोरोनावर मात करण्यासाठी चांगले स्क्रीनिंग, कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे, वैद्यकीय तपासणी प्रयोगशाळा, व्यक्तीगत सुरक्षा उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत मिळेल.'


पाहा व्हिडीओ : दोन आठवड्यात अमेरिकेत 1 कोटी नोकऱ्यांवर कुऱ्हाड, कोरोनाचा परिणाम



दक्षिण आशियामध्ये वर्ल्ड बँकेमार्फत मदत करण्यात येणार आहे. यामध्ये पाकिस्तानसाठी 20 कोटी डॉलर, अफगानिस्तानसाठी 10 कोटी डॉलर, मालदीवसाठी 73 लाख डॉलर आणि श्रीलंकेसाठी 12.86 कोटी डॉलर्सची मदत करण्यासाठी मंजुरी दिली आहे. तसेच याबाबत बोलताना वर्ल्ड बँकेने सांगितले आहे की, 'संपूर्ण जगात कोरोना व्हायरसविरूद्ध लढा देण्यासाठी 15 महिन्यांच्या दृष्टिने 160 अब्ज डॉलर्स आपत्कालीन सहाय्यता निधीच्या योजनेला मंजुरी दिली आहे.


दरम्यान, कोरोना व्हायरसने जगभरासह देशातही हाहाकार माजवला आहे. जगभरात कोरोनामुळे दहा लाखांहून अधिक जण कोरोनाग्रस्त आहेत. तर 51 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर देशामध्ये कोरोनाचा संसंर्ग झालेल्यांची संख्या 2543 वर पोहोचली आहे. त्यापैकी 179 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर 53 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशातील सर्वाधिक कोरोना बाधित महाराष्ट्रात आहे.


संबंधित बातम्या : 


PM Modi | 5 एप्रिलला वीज बंद करुन घरात दिवे, मेणबत्ती, मोबाईल टॉर्चचा प्रकाश करा : पंतप्रधान मोदी


Corona Lockdown | 21 दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर काय करावं? पंतप्रधानांनी दिल्या सर्व मुख्यमंत्र्यांना सूचना


Corona | सर्वधर्मीय गुरुंना गर्दी न होण्याबाबत आवाहन करा, मुख्यमंत्री ठाकरेंची सूचना, पंतप्रधान म्हणाले...