नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना व्हायरसचं संकट उभं ठाकलं आहे. अशातच एक दिलासादायक बाब म्हणजे, देशातील एकूण कोरोना बाधितांपैकी एकूण 102 रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. त्यांच्या कोरोना तपासणीचा अहवाल नेगेटिव्ह आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढत असून आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या एक हजार पार पोहोचला आहे. तर आतापर्यंत 29 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


कोणत्या राज्यात किती रूग्ण झाले कोरोनामुक्त?

महाराष्ट्रात 25, केरळमध्ये 16, उत्तरप्रदेशमध्ये 11, हरियाणामध्ये 17, कर्नाटकात 5, दिल्लीमध्ये 6, तमिळनाडूत 4, लडाखमध्ये तीन, राजस्थानमध्ये तीन, हिमाचल प्रदेशमध्ये दोन, उत्तराखंडमध्ये 2, तेलंगणा, गुजरात, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि आंध्रप्रदेशमध्ये प्रत्येकी एक-एक रूग्ण कोरोनामुक्त झाला आहे.


कोणत्या राज्यात कोरोनामुळे किती मृत्यू?


कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले असून महाराष्ट्रात मृत्यू झालेल्यांची संख्या 7 आहे. त्यानंतर गुजरातमध्ये पाच, कर्नाटकात तीन, मध्यप्रदेश आणि देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत प्रत्येकी दोन मृत्यू झाले आहेत. केरळ, तेलंगणा, तमिळनाडू, जम्मू-काश्मिर, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार आणि हिमाचल प्रदेशमध्ये कोरोनामुळे प्रत्येकी एक-एक मृत्यू झाला आहे.


पाहा व्हिडीओ : आरोग्य विभागात लवकरच मेगा भरती; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया



देशात आतापर्यंत 11000 पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण


देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे हैदोस घातला असून कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा 11000 हजार पार गेला आहे. देशातील 27 राज्यांमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 1140 लोकांना संसर्ग झाला आहे. तर 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. दोन राज्य केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या 200 पार पोहोचली आहे.


जगभरातही कोरोनाचा कहर

जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून जगभरात एकूण 7 लाख 21 हजार 412 कोरोना बाधित आहेत. आतापर्यंत 33 हजार 956 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 51 हजार 4 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 10 हजार 779 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये स्पेनचा दुसरा क्रमांकावर आहे. स्पेनमध्ये 6803 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर काल स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा यांचाही मृत्यू झाला. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये शाही परिवारातील हा पहिला मृत्यू होता. अमेरिकेतही कोरोनाचा हैदोस पाहायला मिळत आहे. अमेरिकेमध्ये आतापर्यंत 2484 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 42 हजार 47 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या जगभरातील जवळपास 177 देश कोरोनाच्या सावटाखाली आहेत.

संबंधित बातम्या : 

Coronavirus | जगभरात कोरोनाचा हाहाकार! इटली, अमेरिकेत मृत्यूतांडव सुरूच

Coronavirus | अमेरिकेत 1 ते 2 लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती, संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांचा दावा

India Lockdown | वाट दिसू दे गा देवा... लॉकडाऊनमुळे काम गेलं, घरी जाण्यासाठी धडपड