Coronavirus Cases Today : देशात सध्या कोरोना व्हायरस (Covid 19 Updates) पुन्हा एकदा वेगाने पसरताना दिसत आहे. अद्यापही अनेक लोक कोरोनाला (Corona) बळी पडत आहे. देशात आज कोरोना व्हायरसच्या (Coronavirus Updates) 1573 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 10,981 वर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) मंगळवारी कोरोनाची नवीन आकडेवारी जाहीर केली आहे.


Coronavirus Cases in India : कोरोनामुळे 24 तासांत चार जणांचा मृत्यू


देशात मागील 24 तासांत चार जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून देशात दररोज एक हजारहून अधिक कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. सध्या देशात कोरोनाच्या XBB.1.16 व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासन अलर्टवर आहे. कोविड रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात येत आहेत.


Coronavirus Cases in India : देशात 1573 नवे कोरोनाबाधित


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Ministry of Health & Family Welfare) आकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासात 1,573 नवीन कोरोनाव्हायरस प्रकरणे नोंदली गेली आहे. केरळमध्ये चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील एकूण कोरोना मृतांची संख्या 5,30,841 वर पोहोचली आहे. देशात एकूण 4,41,65,703 कोटी रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.


Coronavirus Cases in India : मास्क वापरा, सोशल डिस्टंसिंग पाळा






Coronavirus Cases in India : दररोज सुमारे 1000 रुग्णांची भर


देशात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी झाला होता पण, मागील काही आठवड्यांपासून कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, देशात आज नोंद झालेल्या नवीन कोरोनाबाधितांची संख्या सोमवारच्या तुलनेनं कमी आहे. सोमवारी देशात 1805 रुग्ण तर मंगळवारी 1573 रुग्ण आढळले. कालपेक्षा आज आढळलेल्या रुग्णांमध्ये 232 रुग्णांची घट झाली आहे. मात्र, दिवसागणिक हजार रुग्णांची वाढ होत असल्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे.


Coronavirus Cases in India : खबरदारी घ्या, कोरोना टाळा


भारतात सध्या कोरोना व्हायरससोबतच H3N2 चा संसर्गही वाढताना दिसत आहे. वाढता धोका पाहता गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगानं केलं आहे. तसेच सोशल डिस्टंसिग पाळा आणि शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. घाबरुन जाणू नका, तर काळजी घ्या, असा सल्ला आरोग्य विभागानं दिला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Corona New Variant : कोरोनाच्या नव्या XBB.1.16 व्हेरियंटचा धोका; 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण, जाणून घ्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या