Coronavirus Today : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा धोका अद्याप टळलेला नाही. अद्यापही दैनंदिन कोरोनाबाधितांच्या आकड्यात फारशी घट झालेली नाही. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 31 हजार 222 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आलेली आहे. तर 290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
42 हजार 942 रुग्ण कोरोनामुक्त
आरोग्यमंत्रालयाच्या वतीनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 42 हजार 942 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या वाढून तीन कोटी 22 लाख 24 हजार 937 वर पोहोचली आहे. तर सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 92 हजार 864 एवढी आहे.
आतापर्यंत 4 लाख 41 हजार 42 रुग्णांचा मृत्यू
आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 3 कोटी 30 लाख 58 हजार 843 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ज्यापैकी आतापर्यंत 4 लाख 41 हजार 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात काल (सोमवारी) 3, 626 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात काल (सोमवारी) 3, 626 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5 हजार 988 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 755 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 09 टक्के आहे.
राज्यात काल (सोमवारी) 37 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 47 हजार 695 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12,413 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (71), नंदूरबार (2), धुळे (3), जालना (45), परभणी (59), हिंगोली (18), नांदेड (23), अमरावती (90), अकोला (16), वाशिम (11), बुलढाणा (90), यवतमाळ (12), नागपूर (53), वर्धा (2), भंडारा (1), गोंदिया (5), गडचिरोली (34) या 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 49,99,475 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,89,800 (11.8 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,03,199 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,963 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Corona Vaccination : देशात लसीकरणाचा विक्रम; एकाच दिवसात एक कोटीहून अधिक नागरिकांना डोस