Coronavirus Today : देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी रुग्णसंख्येत किंचित घट झाल्याचं पाहायला मिळाली. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, शुक्रवारी देशात 12 हजार 516 नव्या रुग्णाची भर पडली आहे. गुरुवारी देशात 13 हजार 91 रुग्ण आढळले होते. नव्य रुग्णाच्या संख्येत घट झाली असली तरी मृताची वाढणारी संख्या चिंतेचा विषय आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी मृताची संख्या वाढली आहे. गुरुवारी देशात 501 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. बुधवारी देशात 340 जणांचा मृत्यू झाला होता.


4 लाख 62 हजार 690 जणांचा मृत्यू –
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन कोटी 44 लाख 14 हजार 186 झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होऊन एक लाख 37 बदाप 416 इतकी झाली आहे. देशातील एकूण मृताची संख्या 4 लाख 62 हजार 690 झाली आहे.


3 कोटी 38 लाख रुग्ण कोरोनामुक्त -
सलग 35 दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ही 20 हजारांखाली तर सलग 138 दिवसांपासून 50 हजारांखाली नोंदल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या एक लाख 37 हजार 146 इतकी झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या 0.40 टक्के इतकी आहे. मार्च 2020 नंतर ही सर्वात कमी संख्या आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत तीन कोटी 38 लाख 14 हजार 80 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोनाचा मृत्यूदर 1.30 टक्के इतका झालाय.  


110 कोटी डोस –
कोरोनाविरोधात देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंक 110 कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस देण्यात आले आहेत. मागील 24 तासांत देशात 53 लाख 81 हजार 889 जणांना कोरोनाप्रतिबंधक लस देण्यात आली आहे. देशात आतापर्यंत 110 कोटी 79 लाख 51 हजार 225 लसीचे डोस देण्यात आले आहेत.