Cold Weather in Mumbai : मुंबईकर चांगलेच गारठले असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईत मोसमातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. मुंबईतील अनेक भागात किमान तापमान 14 अंशांवर पोहोचले आहे. थंडीच्या काळात देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पारा 15 ते 16 अंशांपर्यंत राहणे सामान्य असले तरी मुंबईकरांसाठी मात्र थंडीचा कडाका आहे. सोमवारी मुंबईतील तापमान 16 अंशावर होते.
मुंबईत इतकी थंडी यापूर्वी कधीच पडली नसल्याचं लोक सांगतात. काही मुंबई वातावरणात या बदलाचा आनंद घेत आहेत. तर, दुसरीकडे थंडीमुळे मरीन ड्राईव्हवर व्यायाम करणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. बहुतांश लोक घरातच राहून थंडीपासून बचाव करत आहेत. पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत कडाक्याची थंडी कायम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. बदलते हवामान आणि थंडी पाहता पुढील काही दिवस वृद्ध आणि लहान मुलांना विशेष काळजी घ्यावी लागणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसांत मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घट बघायला मिळाली. नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये कमाल तापमान नोंदवले गेलं आहे. तर, नंदुरबारसह नाशिकच्या निफाडमध्येही पारा पाच अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. प्रामुख्याने धुळीच्या वादळाचा परिणाम देखील दिसून आला. पश्चिमी चक्रवातामुळे पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसोबतच राज्यातील तापमानात घट होईल असं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे ही घट झाल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय.
संबंधित बातम्या :
Viral News : लग्नात नववधूची खास स्टाईलमध्ये एंट्री, व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha