Coronavirus : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा कहर अद्याप सुरु आहे. एप्रिल आणि मेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक होता. त्यावेळी दररोज 4 लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत होती. सध्या कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या देशात 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. परंतु, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जुलैच्या गेल्या दोन आठवड्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव फारसा कमी झाला नाही. जाणून घेऊया जुलै महिन्यातील आकडे... 


गेल्या आठवड्यांतील आकड्यांवर एक नजर : 


18 जुलै


एकूण कोरोनाबाधित : 41157
मृत्यू : 518


17 जुलै


एकूण कोरोनाबाधित : 38079
मृत्यू : 560


16 जुलै


एकूण कोरोनाबाधित : 38949
मृत्यू : 542


15 जुलै


एकूण कोरोनाबाधित : 41733
मृत्यू : 583


14 जुलै


एकूण कोरोनाबाधित : 38865
मृत्यू : 622


13 जुलै


एकूण कोरोनाबाधित : 32906
मृत्यू : 2020


12 जुलै


एकूण कोरोनाबाधित : 37154
मृत्यू : 724


11 जुलै


एकूण कोरोनाबाधित : 41506
मृत्यू : 895


10 जुलै


एकूण कोरोनाबाधित : 42766
मृत्यू : 1206


9 जुलै


मामले- 41506
मृत्यू : 911


8 जुलै


एकूण कोरोनाबाधित : 42766
मृत्यू : 817


7 जुलै


एकूण कोरोनाबाधित : 43393
मृत्यू : 930


6 जुलै


एकूण कोरोनाबाधित : 34703
मृत्यू : 553


5 जुलै


एकूण कोरोनाबाधित : 39796
मृत्यू : 723


कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी : 


देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या सध्या चार लाखांहून अधिक आहे. एकूण 4 लाख 22 हजार रुग्ण अद्याप कोरोनावर उपचार घेत आहेत. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासूनच आतापर्यंत तीन कोटी 11 लाख 6 हजार रुग्ण संक्रमित झाले आहेत. यापैकी 4 लाख 13 हजार 609 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 3 कोटी 2 लाख 69 हजार रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. 


दरम्यान, देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.33 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 97 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 1.36 टक्के आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत जगात सहाव्या स्थानी आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :