Coronavirus Today : देशात जीवघेण्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मंदावला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 34 हजार 703 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, देशात 111 दिवसांनी सर्वात कमी दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत देशात अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत घट होऊन चार लाख 64 हजार 357 वर आली आहे. तसेच देशाचा रिकव्हरी रेट 97.17 टक्के इतका आहे. भारतात सलग आठव्या दिवशी नव्या कोरोना रुग्णांच्या दैंनदिन संख्येच घट झाली आहे. 


दरम्यान, राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पंजाब, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातसह देशातील 10 मोठ्या राज्यांमध्ये आता कोरोनाचा वेग मंदावला आहे. दरम्यान, महाराष्ट्र, कर्नाटक, असम, बंगाल, मिजोरम, तेलंगाणा, जम्मू काश्मीर आणि झारखंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप फारसा कमी झालेला नाही. 


राज्यात सोमवारी 13027 रुग्णांना डिस्चार्ज, 6740 रुग्णांची भर; पाच जिल्ह्यात रुग्णसंख्या शुन्यावर


कोरोनाच्या रविवारच्या आकडेवाडीमुळे काहीशी चिंता वाढली होती. कारण राज्यात रविवारी 3378 रुग्ण बरे झाले होते, तर 9336 रुग्णांची भर पडली होती. मात्र सोमवारी राज्यातील कोरोनाची आकडेवारी काहीशी दिलासादायक आहे. काल राज्यात 6740 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 13 हजार 27 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 58 लाख 61 हजार 720 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.02 टक्के आहे. 


राज्यात आज 51 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 48 महापालिक क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 16 हजार 827 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यवतमाळ (57), हिंगोली (84), गोंदिया (88) या तीन जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16,960 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


पाच जिल्ह्यात रुग्णसंख्या शुन्यावर 


धुळे, नंदुरबार, हिंगोली, भंडारा, नांदेड या पाच जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापुरात सर्वाधिक 1234 रुग्णांची नोंद झाली आहे. 


मुंबईत आज 489 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 10 जणांचा मृत्यू


मुंबई गेल्या 24 तासात 489 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 645 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंतर 6 लाख 9 9 हजार 341 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. सध्या मुंबईत 7947 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा दर आता 802 दिवसांवर गेला आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 


पुण्यात 150 नव्या रुग्णांनी नोंद


पुणे महापालिका क्षेत्रात आज 150 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 249 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या 2679 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज पुण्यात 5 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :