पश्चिम बंगाल : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांचे पुत्र अभिजित मुखर्जी (Abhijit Mukherjee) यांनी काल सोमवारी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षाला मोठा धक्का देत मुखर्जी यांनी सोमवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कोलकाता येथे एका कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांनी ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांच्या पक्षाच्या तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून अभिजित मुखर्जी यांच्या टीएमसीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांसोबत भेटीगाठी वाढल्या होत्या. त्यानंतर ते टीएमसीत प्रवेश घेतील अशी शक्यता वर्तवली जात होती.


टीएमसी त्यांना जंगीपूर विधानसभा मतदारसंघातून लढवू शकते. दरम्यान 2019 मध्ये काँग्रेसने त्यांना जंगीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीचं तिकीट दिलं होत, पण त्यांचा पराभव झाला होता. तर अभिजित मुखर्जी यांनी 2012 आणि 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर बंगालमधील जंगीपूरमधून लोकसभा निवडणूक लढविली आणि जिंकली होती.


तर दुसरीकडे अभिजित मुखर्जी यांचा टीएमसीमध्ये जाण्याचा निर्णय त्यांच्या बहिण शर्मिष्ठा मुखर्जी यांना अजिबात आवडला नसल्याने याबाबत त्यांनी ट्विटरवरुन आपली नाराजी व्यक्त केली.


भाजप नेते मुकुल रॉय यांची घरवापसी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश


अभिजित मुखर्जी यांचे काँग्रेसवर आरोप


तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करताच अभिजित मुखर्जी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला. प्राथमिक सभासद वगळता मला काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही गटामध्ये सामील केले नव्हते. एवढेच नाही तर मला कोणतही पद देखील दिलं गेलं नव्हतं. आता मी तृणमूल काँग्रेसमध्ये एक सैनिक म्हणून रुजू झालो आहे. त्यामुळे पक्षाच्या सूचनांनुसार काम करेन. अखंडता आणि धर्मनिरपेक्षता राखण्यासाठी मी काम करेन, असे अभिजित मुखर्जी यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हटले.


अभिजित मुखर्जी यांच्याकडून ममता बॅनर्जींचे कौतुक


असे अभिजीत मुखर्जी यांनी म्हटले, की ‘ममता बॅनर्जी यांनी ज्या प्रकारे भाजपाच्या जातीय हिंसाचाराच्या लाटेला रोखले आहे, मला विश्वास आहे की भविष्यात त्या संपूर्ण देशात इतर राज्यांतील या लाटेला अशीच कामगिरी करून रोख लावतील’.


दरम्यान काही दिवसांपूर्वीच भाजपचे (BJP)राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय (Mukul Roy) यांची चार वर्षानंतर घरवापसी झाली आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये त्यांनी टीएमसी (TMC)सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी मुख्यमंत्री ममता बनर्जी (CM Mamata Banerjee)यांच्याशी चर्चेनंतर त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. ‘घरी येऊन चांगलं वाटत आहे. बंगाल ममता बॅनर्जी यांचा आहे आणि त्यांचंच राहणार. मी भाजपमध्ये राहू शकत नव्हतो’ अशी प्रतिक्रिया त्यानी टीएमसीमध्ये प्रवेश केल्यानंतर दिली.