Earthquake in Delhi: दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के (Delhi NCR Earthquake Latest update) बसल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे. 3.7 रिश्टर स्केलची तीव्रतेचे हे धक्के असल्याचं सांगण्यात आलं आहे. भूकंपाचं केंद्र  हरियाणा मधील झज्जर मध्ये असल्याचं सांगण्यात आलं आहे. रात्री 10:36 वाजताच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवल्याचं काही नागरिकांनी सांगितलं. भूकंपाची खोली 5 किलोमीटरपर्यंत असल्याचं सांगण्यात येत आहे. 


दरम्यान दिल्लीत भूकंपाचे धक्के बसल्यानंतर सोशल मीडियावर लोकं एकमेकांना भूकंपाबद्दल विचारणा करु लागली होती. यात अनेकांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याचं सांगितलं.  


फेब्रुवारी 2021 महिन्यात देखील जम्मू-काश्मीरपासून दिल्ली एनसीआरपर्यंत भूकंपाचे तीव्र झटके जाणवले होते. त्यावेळी भूकंपाचं केंद्र ताजिकिस्तान होतं आणि याची तीव्रता 7.5 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली होती. त्यावेळी भूकंपाचे झटके पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि चंदिगढ या राज्यातही जाणवले होते. 


भूकंप होतात तरी कसे?


पृथ्वीच्या गाभ्याच्या आणि कवचाच्या मध्ये असलेले मेटल द्रवरुप असते. अर्धवट द्रवरुप असल्याने ते पृथ्वीच्या बाह्य कवचाला चिकटते. त्यामुळे पृथ्वीचे मॅग्नेटिक फील्ड बदलते. त्याचा थेट परिणाम पृथ्वीच्या परिवलनावर होतो आणि पृथ्वीची गती काही मिलिसेकंदांनी कमी होते. दिवसाच्या आकारातही बदल होतो. यामुळे चुंबकीय तरंग निर्माण होऊन भूकंप होतात.


भूकंप झाल्यास कोणती काळजी घ्यावी?


तुम्ही एखाद्या इमारतीत असताना भूंकपाचे तीव्र धक्के जाणवू लागले तर तात्काळ एखाद्या मजबूत फर्निचरचा आसरा घेऊन त्याखाली जाऊन लपा. किंवा एखाद्या कोपऱ्यात उभे राहून तुमचा चेहरा आणि डोकं झाकण्याचा पुरेसा प्रयत्न करा.
शक्य झाल्यास तात्काळ इमारतीतून बाहेर पडा आणि मोकळ्या मैदानात जाण्याचा प्रयत्न करा.
तुम्ही एखाद्या वाहानात बसले असल्यास तत्काळ वाहन थांबवा आणि आतच बसून राहा
जर तुम्ही ढिगाऱ्याखाली अडकले असाल तर चुकूनही काडेपेटी जाळू नका. तसंच अजिबात हलण्याचा प्रयत्न करु नका.
ढिगाऱ्याखाली अडकल्यानंतर एखाद्या पाईप किंवा भिंतीवर हळूहळू हात मारा. जेणेकरुन बचाव पथक तुमच्यापर्यंत पोहचू शकेल.