नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरस वेगाने फोफावताना दिसत आहे. देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोना ग्रस्तांचा आकडा 5000 पार गेला आहे. तर आतापर्यंत 149 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण 410 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. बुधवारी जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, देशामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 5194 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकड्यांनुसार, आंध्रप्रदेशमध्ये 305 लोक या महामारीचे शिकार झाले आहेत. तर आतापर्यंत 4 लोकांचा मृत्यू झाला आहे.


कोरोना बाधितांचा मृत्यूदर महाराष्ट्रात सर्वाधिक; देशपातळीवर चिंतेचा विषय


कोरोनाचा महाराष्ट्रात सर्वाधिक संसर्ग


देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. राज्यातील मृतांचा आकडा 64 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रामध्ये 1018 लोक या आजाराने पीडित आहेत. आतापर्यंत 79 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मणिपूरमध्ये 2, मिझोराममध्ये 1, ओडिशामध्ये 42 या आजारामुळे पीडित असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पद्दुचेरीमध्ये 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.


कोणत्या राज्यात किती कोरोनाचे रूग्ण?


राज्यातील आकड्यांबाबत बोलायचे झालं तर, दिल्लीमध्ये कोरोना पीडित लोकांची संख्या 576 वर पोहोचली आहे. 21 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे. गोवामध्ये फक्त 7 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. गुजरातमध्ये 165 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 25 जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे.


पाहा व्हिडीओ : पंतप्रधान मोदींकडून लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत



अंदमान निकोबारमध्ये 10 कोरोना पीडित आहेत. अरूणाचल प्रदेशमध्ये 1, आसाममध्ये 27 आणि बिहारमध्ये 38 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. बिहारमध्ये एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर चंदिगढमध्ये 18 आणि छत्तीसगढमध्ये 10 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. हरियाणामध्ये 147 लोकांना कोरोना झाला आहे. , 28 जणांना जिस्चार्ज दिला आहे. या राज्यामध्ये कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 18 लोक कोरोनाग्रस्त असून दोघांना घरी सोडण्यात आलं आहे. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.


जम्मू-काश्मिरमध्ये संसर्ग झालेल्यांचा आकडा वाढताना दिसत आहे. येथे 116 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. झारखंडमध्ये आतापर्यंत फक्त 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कर्नाटकात 175 लोक कोरोना पॉझिटिव्ह असून 25 जणांना घरी पाठवण्यात आलं आहे. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये 336 कोरोनाग्रस्त आहेत, तर 70 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. लदाखमध्ये 14 लोकांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी 10 जण बरे झाले आहेत. मध्यप्रदेशमध्ये कोरोना बाधितांचा आकडा 229 वर पोहोचला असून आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे.


पंजाबमध्ये 91 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 4 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राजस्थानमध्ये हा आकडा वाढून 328 पर्यंत पोहोचला असून 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये हा आकडा वेगाने वाढत आहे. राज्यामध्ये 690 लोकांना या आजाराने ग्रासले आहे. आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 19 रूग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तेलंगणामध्ये 427 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 35 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 7 लोकांचा मृत्यू झाला आहे.


संबंधित बातम्या : 


पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 एप्रिलला सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, 'लॉकडाऊन'बाबत निर्णय होण्याची शक्यता


Lockdown | लॉकडाऊन वाढवायचा की नाही यावर केंद्र स्तरावर मंथन सुरु


लॉकडाऊन संपल्यानंतरचं रेल्वेचं नियोजन ठरलं, पाहा कधी सुरु होणार ट्रेन!दे