Coronavirus India Update : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरुच आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत असली तर मृतांचा आकडा धडकी भरवणारा आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 60 हजार 471 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्याता आली आहे. तर देशात 2726 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, देशात तब्बल 75 दिवसांनी एका दिवसात एवढ्या कमी रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली आहे. तसेच गेल्या 24 तासांत एक लाख 17 हजार 525 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जाणून घेऊया देशातील कोरोना स्थिती... 


देशातील आजची कोरोना स्थिती


एकूण कोरोना रुग्ण : दोन कोटी 95 लाख 70 हजार 471
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 82 लाख 80 हजार 472 
एकूण सक्रिय रुग्ण : 9 लाख 13 हजार 368
एकूण मृत्यू : 3 लाख 77 हजार 31
आतापर्यंतची एकूण लसीकरणाची आकडेवारी : 25 कोटी 90 लाख 44 हजार 72 


आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार, भारतात काल कोरोना व्हायरससाठी 17 लाख 51 हजार 358 सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे देशात आतापर्यंत 38 कोटी 13 लाख 75 हजार 984 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. 


राज्यातील अॅक्टिव्ह रुग्ण दीड लाखांच्या खाली, सोमवारी 8,129 नवे कोरोनाबाधित तर 14,732 रुग्ण कोरोनामुक्त 


राज्यात काल (सोमवारी) 8,129 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 14,732 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल 200 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काल आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास सहा हजारांनी जास्त नोंदवण्यात आली आहे. राज्यात काल एकूण 1,47,354 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 15 जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही तर 13 ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


आजपर्यंत एकूण 56,54,003 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.55 टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल 200 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.90 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,82,15,492 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,17,121 (15.48 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 9,49,251 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,997 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 529 कोरोनाबाधितांची नोंद


मुंबईत गेल्या 24 तासांत 700 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 725 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 6,84,107 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईचा ओव्हरऑल रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर गेला आहे. सध्या मुंबईत 15,550 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 672 दिवसांवर गेला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :