नवी दिल्ली :  देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची गती कमी होताना दिसत आहे. 73 दिवसांनंतर देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आठ लाखांहून कमी झाली आहे तर 58 दिवसांनंतर मृतांचा आकडा हा दोन हजारांपेक्षा कमी झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 62,680 रुग्ण सापडले असून 1587 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 88,977 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. काल एकाच दिवसात कोरोनाचे 28,084 सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. 


त्याआधी गुरुवारी देशात 67,208 कोरोना रुग्णांची भर पडली होती. आतापर्यंत देशात 26 कोटी 89 लाख कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासात 32 लाख 59 हजार कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. 


देशातील आजची कोरोना स्थिती : 



  • एकूण कोरोना रुग्ण : दोन कोटी 97 लाख 62 हजार 793 

  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 85 लाख 80 हजार 647 

  • एकूण सक्रिय रुग्ण : 7 लाख 98 हजार 656

  • एकूण मृत्यू : 3 लाख 83 हजार 490

  • आतापर्यंतची एकूण लसीकरणाची आकडेवारी : 26 कोटी 89 लाख 


देशातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर हा 1.29 टक्के असून बरे होण्याचे प्रमाण हे 96 टक्के इतकं आहे. 


राज्यातील कोरोनाची स्थिती
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. गुरुवारी 9,830 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5,890  कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 236  कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण 1,39,960 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 


आजपर्यंत एकूण 56,85,636 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.64 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 236 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.95 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,88,57,644 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,44,710 (15.3 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 8,50,663 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,964 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


महत्वाच्या बातम्या :