नवी दिल्ली : जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून बचावासाठी देशात लॉकडाऊन लागू केलाय ज्याचा आज शेवटचादिवस आहे. मात्र तरी देखील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. देशात आतापर्यंत 9,352 लोकांना कोरोनाची लागण झाली. यापैकी 979 रुग्ण बरेदेखील झालेत. 324 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रात दिसून येतो. महाराष्ट्रात कोरोनाचा मृत्यूदर देखील सार्वाधिक आहे.


कोणत्या राज्यात किती कोरोनाग्रस्तांचा मृत्यू?

आरोग्य मंत्रालयाने दिलल्या माहिती नुसार, महाराष्ट्र 149, मध्य प्रदेश 43, गुजरात 26, पंजाब 11, दिल्ली 24, तमिळनाडु 11, तेलंगणा 16, आंध्र प्रदेश 7, कर्नाटक 6, पश्चिम बंगाल 7, जम्मू-काश्मीर 4, उत्तर प्रदेश 5, हरियाणा 3, राजस्थान 3, केरळ 3, झारखंड 2, बिहार, आसाम, हिमाचल प्रदेश और ओडिसा मध्ये प्रत्येकी एक-एक मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन करण्यात आलं. या काळात जिल्हा पातळीवर केलेल्या उपाययोजनांचा परिणां दिसायला सुरुवात झाली आहे. देशातील कोरोना प्रभावित अशा 15 राज्यांतील 24 जिल्ह्यात गेल्या 14 दिवसांत कोरोनाचा पॉझिटिव्हचा एकही रुग्ण समोर आला नाही. यात महाराष्ट्रातील, छत्तीसगड माधील दुर्ग आणि बिलासपुर, केरळातील वायनाड, मणिपुरील इंफाळ पश्चिम आणि बिहारमधील पाटना या राज्यांचा समावेश आहे.

वाचा : Coronavirus | देशातील लॉकडाऊन वाढणार? पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार

लॉकडाऊनच्या काळात देशातील प्रत्येक राज्यांतील जीवनावश्यक वस्तूंची पूर्तता करण्यासाठी सरकरारने मालवाहतूक सुरु ठेवली होती. तसेच जीवनावश्यक वस्तूंसंबधीत सर्व औद्योगिक उद्योग सुरु ठेवण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2334 वर

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढणारी संख्या चिंतेची बाब आहे. राज्यात सोमवारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 352 ने वाढली आहे. नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2334 झाली आहे. मुंबईत सर्वाधिक 242 रुग्ण  सोमवारी एका दिवसात आढळले आहेत. पुणे महापालिका क्षेत्रात 39 रुग्ण आढळले आहेत, तर मालेगावात 14 रुग्ण आज आढळले आहेत.

VIDEO | महाराष्ट्राचा मृत्यूदर अधिक का? कोरोनाच्या मृत्यूदराच्या अभ्यासासाठी समितीची स्थापना



पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. आज या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. याच प्राश्वभूमीवर पंतप्रधान आज सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार आहेत.

दोन आठवड्यांनी वाढू शकतो लॉकडाऊन

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेला संबोधित करताना देशातील लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी वाढवू शकतात. असंदेखील सांगितलं जात आहे की, यंदा लॉकडाऊनमध्ये काही क्षेत्रांना सुटही मिळू शकते.

VIDEO | कोरोनाच्या 100 बातम्या, जगभरातील कोरोना व्हायरसचे शंभर अपडेट्स