Coronavirus Cases in India : भारतातील कोरोना (Covid-19) संसर्गाचा कहर अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 635 नवीन रुग्ण आढळून आले असून 11 संक्रमित लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्याची एकूण कोरोना बाधितांची संख्या 4 कोटी 46 लाख 67 हजार 311 झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात एक हजाराहून अधिक रूग्ण बरे झाले आहेत. त्याचबरोबर सक्रिय कोरोना बाधित रूग्णांची संख्या 7 हजार 561 वरून 7 हजार 175 वर आली आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात आतापर्यंत कोरोना लसीचे सुमारे 220 कोटी डोस देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 1 लाख 19 हजार 851 जणांनी कोरोना लस घेतली. कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या 5 लाख 30 हजार 546 वर पोहोचली आहे. 24 तासांत एकूण 11 मृत्यूंमध्ये केरळमधील नऊ लोकांचाही समावेश आहे. संसर्गामुळे मृत्यूची दोन प्रकरणे आहेत, त्यापैकी एक महाराष्ट्रातील आहे आणि एक रुग्ण दिल्लीचा आहे.
देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण
नवीन आकडेवारीनुसार, देशात कोरोना विषाणू संसर्गाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 7 हजार 175 वर आली आहे. गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णांच्या संख्येत 386 ची घट नोंदवण्यात आली आहे.
आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 41 लाख 29 हजार 590 लोक कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त झाले आहेत. तर, कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. त्याच वेळी, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत कोविड-19 विरोधी लसींचे 219.83 कोटी डोस देण्यात आले आहेत.
कोरोनाचे मागील आकडे :
19 डिसेंबर 2020 रोजी कोरोना प्रकरणांनी देशात एक कोटींचा आकडा पार केला होता. गेल्या वर्षी 4 मे रोजी बाधितांची संख्या दोन कोटींच्या पुढे गेली होती. तर, 23 जून 2021 रोजी ही संख्या तीन कोटींच्या पुढे गेली होती. यावर्षी 25 जानेवारी रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे चार कोटींच्या पुढे गेली होती. तर, आता एकूण कोरोना बाधितांची संख्या 4 कोटी 46 लाख 67 हजार 311 झाली आहे.
महत्वाच्या बातम्या :