Petrol-Diesel Price Today 17th November : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मात्र, कच्च्या तेलातील बदलांचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत (Petrol-Diesel Price) होताना दिसत नाही. 22 मे नंतर देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरांत कोणताही बदल झालेला नाही. आज म्हणजेच, 17 नोव्हेंबरपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. आज देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. 


आजचे कच्च्या तेलाचे दर काय? 


गेल्या 24 तासांत कच्च्या तेलाच्या किमतीत कच्च्या तेलाच्या दरांमध्ये किंचित बदल झाला आहे. ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे दीड डॉलरने घसरून 92.26 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे. तसेच, डब्ल्यूटीआय प्रति बॅरल 85.31 डॉलरच्या किंमतीला विकलं जात आहे. 


पेट्रोल-डिझेलचे दर कसे तपासाल?


तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. कंपन्या त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर तेलाच्या किमती जारी करतात, ज्या तुम्ही मेसेज किंवा मिस्ड कॉलद्वारे सहज मिळवू शकतात. 


तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. यासाठी तेल विपणन कंपन्यांनी टोल फ्री क्रमांक शेअर केला आहे. तुम्ही इंडियन ऑईलचे ग्राहक असल्यास, तुम्ही RSP 9224992249 वर एसएमएस करू शकता आणि तुम्ही BPCL ग्राहक असल्यास, तुम्ही RSP एसएमएस करून 9223112222 वर एसएमएस करू शकता आणि तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची माहिती मिळवू शकता. याशिवाय, HPCL ग्राहक 9222201122 वर HPPprice पाठवून देखील जाणून घेऊ शकतात.