Unnao Rape Case : उत्तर प्रदेशमधून ( Uttar Pradesh ) पुन्हा एकदा काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. उन्नाव जिल्हा आणखी एका 'निर्भया कांड' मुळे हादरलं आहे. उन्नावमधील ( Unnao ) एका कॉलेजच्या तरुणीवर तिच्याच घरात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. रक्तस्त्रावामुळे पीडितेचा मृत्यू झाला आहे. 10 नोव्हेंबर रोजी आरोपी तरुणीच्या घरी शक्तिवर्धक गोळ्या खाऊन पोहोचला. घरी इतर कुणीही नसल्याची संधी साधत त्याने तरुणीवर बलात्कार केला. पीडितेच्या गुप्तांगामधून रक्तस्त्राव सुरु झाल्यावर आरोपीने तिथून पळ काढला.


उन्नावमध्ये तरुणीवर घरात घुसून अत्याचार


उन्नाव जिल्ह्यातील एका गावामध्ये दलित तरुणीचा मृतदेह घराच्या अंगणात आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा आता पोलिसांनी खुलासा केला आहे. पीडितेचा मृतदेह अंगणामध्ये आढळला होता. तरुणी घरात एकटी होती. बलात्कारानंतर जास्त रक्तस्त्रावामुळे तरुणीचा मृत्यू झाला. पीडिता आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते. आरोपीने तिच्या घरात घुसून अत्याचार केला आणि तरुणीची हालत खराब झाल्यावर आरोपीनं तिथून पळ काढला. रक्तस्त्रावामुळे पीडितेचा मृत्यू झाला.


उन्नाव जिल्ह्यातील कोतवाली परिसरात एका दलित तरुणीचा मृतदेह अंगणात आढळला होता. 10 नोव्हेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. तरुणीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याने पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते.


जास्त रक्तस्त्रावामुळे पीडितेचा मृत्यू


पोलिसांनी या प्रकरणी आरोपी राज गौतम या 25 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून त्याने गुन्ह्याची कबूली दिली आहे. पीडिता कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. पोलिसांनी पीडितेच्या फोनवरील चॅट आढळले. ज्यामध्ये आरोपी तरुणीला तिच्या घरी येऊ का असं विचारतो याला तरुणी नकार देते. त्यानंतर आरोपी शक्तीवर्धक गोळ्या खाऊन पीडितेच्या घरी पोहोचला. त्याने तरुणीवर जबरदस्तीनं अत्याचार केला आणि त्यानंतर घाबरून तिथून पळ काढला. तरुणी अंगणात जखमी अवस्थेत आढळल्याने कुटुंबियांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तरुणीला मृत घोषित केलं.


IAS बनण्याचं तरुणीचं स्वप्न धुळीला


पीडितेच्या आई-वडिलांनी सांगितलं की, तरुणी शिक्षणावर लक्ष केंद्रीत करत होती. तिला आयएएस अधिकारी बनायचं होतं. पीडिता स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत होती. तिने शिक्षणासाठी बँकेतून कर्जही काढलं होतं.