नवी दिल्ली : साधारण वर्षभरापासून देशात आणि संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या (Coronavirus) कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी म्हणून अनेक राष्ट्र प्रतिबंधात्मक लसींच्या संशोधनाच व्यग्र आहेत. असं असतानाच भारतही यात मागे नाही. किंबहुना देशात लसीकरणाला आता काही दिवासंमध्ये सुरुवात होणार असल्याटचं चित्र आहे.
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच देशातील कोरोना परिस्थितीबाबत वक्तव्य करत लसीकरणाची बहुतांश प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आल्याची मोठी माहिती दिली. देशातील जनतेला भारतात निर्मिती झालेल्या लसीची मात्र देण्यात येणार असल्यांचही त्यांनी सांगितलं. केंद्रानं नियुक्त केलेल्या काही तज्ज्ञांनी कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासंबंधीच्या निवेदनांचा आढावा घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच गुरुवारी पंतप्रधानांनी हे वक्तव्य केलं.
गुजरातमधील All India Institute Of Medical Sciences (AIIMS) शिलान्यास कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांना संबोधतेवेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. देशात नव्यानं कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे, असंही ते यावेळी म्हणाले. पण, दुसरीकडेच ते नागरिकांना सतर्क करण्यास विसरले नाहीत. लसीकरणानंतरही कोरोनाच्या बाबतीत घेतली जाणारी काळजी आणि पाळले जाणारे नियम हे सातत्यानं टीकून राहिले पाहिजेत यासाठी ते आग्रही दिसले.
जब तक दवाई नही, ढिलाई नही; असं मी नेहमी म्हणायचो. पण 2021 साठी माझा मंत्र असेल दवाई भी, कडाई भी. अर्थात येत्या वर्षामध्ये लसीसोबतच सावधगिरीही तितकीच महत्त्वाची असाच मंत्र त्यांनी संपूर्ण देशाला दिला. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत आणि लसीकरणाच्या प्रक्रियेबाबत मोदींनी 2020 या वर्षाच्या अखेरच्या दिवशी जनतेला खऱ्या अर्थानं मोठा दिलासा दिला असं म्हणायला हरकत नाही.