Coronavirus Cases Today : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) घटल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच दैनंदिन रुग्णसंख्येतही कमालीची घट पाहायला मिळत आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव घटला असला तरी, धोका मात्र अद्याप टळलेला नाही. देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 283 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 437 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात एक लाख 11 हजार 481 सक्रिय रुग्ण आहेत. जाणून घेऊया देशाची सध्याची कोरोनास्थिती...
आतापर्यंत देशात 4 लाख 66 हजार 584 रुग्णांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल दिवसभरात 10 हजार 949 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशातच या व्हायरसमुळे जीव गमावलेल्या रुग्णांची संख्या 4 लाख 66 हजार 584 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 3 कोटी 45 लाख 35 हजार 736 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात गेल्या 24 तासांत 766 रुग्णांची नोंद तर 19 जणांचा मृत्यू
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या आकडेवारीत स्थिरता दिसून येत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 766 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एकूण 929 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत एकूण 64,77,379 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण हे 97.68 टक्के इतकं झालं आहे. राज्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही कमी झाली असून त्याचे प्रमाण हे 2.12 टक्के इतकं झालं आहे. राज्यातील 85,335 रुग्ण हे होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1077 रुग्ण हे संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 9,493 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- लगीनसराईवर पालिकेचा वॉच! लग्न सोहळे, डिसेंबरमधील पार्ट्यांवर मुंबई महापालिकेची नजर, कोरोना नियम मोडल्यास कारवाई
- Mumbai Local Trains : लोकल प्रवाशांसाठी खुशखबर; लसीचे दोन डोस घेतलेल्यांना तिकीट मिळवणं आणखी सोपं
- Mumbai Vaccination : तीन लाख मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई पालिका सज्ज; राज्य सरकारच्या सूचनेनंतर लसीकरण सुरु करणार