Coronavirus Cases Today in India : देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये थोडी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 14 हजार 148 नवीन रुग्ण आढळले असून 302 जणांचा मृत्यू झाला आहे.काल 15 हजार 102 रुग्णांची नोंद झाली होती. म्हणजेच कालच्या तुलनेत आज रुग्णवाढ कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 30 हजार 9 लोक बरे झाले आहेत. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
सक्रिय प्रकरणांची संख्या 1 लाख 48 हजार 359 इतकी कमी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 48 हजार 359 इतकी झाली आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 12 हजार 924 इतकी झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 22 लाख 19 हजार 896 लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.
आतापर्यंत सुमारे 176 कोटी डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत सुमारे 176 कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे डोस देण्यात आले आहेत. बुधवारी दिवसभरात 30 लाख 49 हजार 988 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत लसीचे 176 कोटी 52 लाख 31 हजार 385 डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धे आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 1.94 कोटी (1,94,97,567) पेक्षा जास्त प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. देशात कोविड विरोधी लसीकरण मोहीम 16 जानेवारी 2021 पासून सुरू झाली आणि पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. त्याच वेळी, कोरोना योद्धांसाठी लसीकरण मोहीम 2 फेब्रुवारीपासून सुरू झाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- iPhone 13 : गेहलोत सरकारकडून सर्व 200 आमदारांना iPhone 13 भेट, 'हे' आहे कारण?
- E Challan : ट्रॅफिक नियम मोडल्याने ई-चलन निघालंय? घरबसल्या सहज ऑनलाईन भरा दंड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha