Coronavirus Cases Today in India : देशात कोरोना विषाणूच्या वाढता आलेख मागील काही दिवसापासून घटताना दिसत आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 2 हजार 827 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून असून 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवसाच्या तुलनेनं नवीन कोरोना रुग्णांची संख्या 70 ने घटली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवशी कोरोनाबळींची संख्या 54 होती.


नव्या रुग्णांमधील सर्वाधिक रुग्ण दिल्लीत
नव्या कोरोना रुग्णांमधील 970 रुग्ण फक्त दिल्लीतच आढळले आहेत. यामागोमाग केरळमध्ये 489 रुग्ण आणि हरियाणामध्ये 383 रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सलग तिसऱ्या दिवशी नवीन कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांच्या खाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 3 हजार 230 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.






 


सध्या देशात 19 हजार 67 रुग्ण कोरोना संसर्गावर उपचार घेत आहेत. नवीन 24 मृत्यूंसह देशातील कोरोना बळींची संख्या 5 लाख 24 हजार 181 एवढी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 70 हजार 165 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत
190 कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.


रेल्वे प्रवास करताना मास्क वापरा, मात्र त्याची सक्ती नाही


रेल्वेचा प्रवास करत असाल तर मास्क घाला असं रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवाशांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र रेल्वे प्रवास करताना मास्कची सक्ती नाही हेही रेल्वेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. रेल्वे मंत्रालयानं याबाबत एक परिपत्रक जारी केलं असून त्याबाबतच्या विस्तृत सूचना या सर्व झोनना देण्यात येणार आहेत. यामध्ये कोरोनाचा धोका लक्षात घेता प्रवाशांनी मास्कचा वापर करावा असं सांगण्यात येत आहे. पण ही मास्क सक्ती नाही असं ही स्पष्ट करण्यात आलं आहे. दिल्लीसारख्या काही राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्यामुळे काही राज्यांमधेय मास्कची सक्तीही करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना अधिक काळजी घेण्याचं आवाहवन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या