Coronavirus News Cases Today in India : जगासह भारतातही कोरोना विषाणूचा फैलाव अद्याप कायम आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. रविवारी दिवसभरात देशात 17,073 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात पाच लाखआंहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरात राबवण्यात आलेल्या कोरोना लसीकरणामुळे कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी करण्यात यश आलं असलं, तरीही अद्याप कोरोना विषाणूच्या संसर्गावर पूर्णपणे मात करता आलेली नाही. देशात सध्या 94 हजारांहून अधिक रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार घेत आहेत. 


गेल्या 24 तासांत देशात 15 हजार 208 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.57 टक्क्यांवर पोहोचले आहे. यासह आतापर्यंत देशात एकूण 4 कोटी 27 लाख 87 हजार 606 रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. दैनंदिन रुग्ण सकारात्मकता दर 5.62 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर आठवड्यातील रुग्णांचा सकारात्मकता दर 3.39 टक्के आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत भारतात 5 लाख 25 हजार 20 कोरोना  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


देशव्यापी लसीकरणात रविवारी दिवसभरात 2 लाख 49 हजार 646 कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशात एकूण 197 कोटी 11 लाख 91 हजार 329 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.






महाराष्ट्रात 6493 नव्या रुग्णांची नोंद, 6213 रुग्ण कोरोनामुक्त


महाराष्ट्रात 6493 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर रविवारी दिवसभरात एकूण 6213 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नवीन नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत सर्वाधिक म्हणजे 2771 रुग्णांची भर पडली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या