Assam Flood : आसाममध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अद्यापही येथे पाऊस सुरु असून पूरस्थिती अधिक वाईट होताना दिसत आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. पुरामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुरामुळे एकूण 126 जणांनी प्राण गमावले आहेत. पुरामुळे आसाममधील 32 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) दिलेल्या माहितीनुसार, बारपेटा, कछार, दरांग, करीमगंज आणि मोरीगाव जिल्ह्यातील काही भागांमध्ये पूरजन्य परिस्थिती असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजून दोन जण बेपत्ता आहेत.
मृतांचा आकडा 126 वर पोहोचला
आसाममध्ये पुरामुळे आणखी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यावर्षी पूर आणि भूस्सखलामुळे 126 जणांनी आपला जीव गमावला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, बजली, बक्सा, बारपेटा, कछार, चिरांग, दरांग, धेमाजी या भागांमध्ये 22 लाख 21 हजार 500 हून अधिक जणांनआ पुराचा फटका बसला आहे.
बारपेटा भागात सर्वाधिक नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार, बारपेटा येथे पुराचा सर्वाधिक फटका बसला असून सात लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. यानंतर नागावमध्ये 5.13 लाखांहून अधिक, कचर जिल्ह्यात 2.77 लाख लोक बाधित झाले आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी कचारमधील सिल्चर आणि कामरूपमधील पूरजन्य परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतला.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Assam Flood : आसाममध्ये दरवर्षी 2 हजार गावांना बसतो पुराचा फटका, तर दरवर्षी आठ हजार हेक्टरील जमिनीची होते धूप
- Assam Flood : कौतुकास्पद! रुग्णासाठी आसामच्या मंत्र्यांनी पुरात चालवली बोट; व्हिडीओ व्हायरल
- Assam Flood : आसाममध्ये 'आभाळ फाटलं'; जनजीवन विस्कळीत