Coronavirus Cases Today in India : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग कायम आहे. गेल्या 24 तासांत देशातील कोविड-19 रुग्णांमध्ये 126 रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे. देशात एका दिवसात 5 हजार 443 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, देशातील कोरोना सकारात्मकता दर 1.61 टक्के आणि साप्ताहिक कोरोना रुग्ण सकारात्मकता दर 1.73 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या देशात 46 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4 कोटी 45 लाख 53 हजार 42 वर पोहोचली आहे.


देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 46 हजार 342


मागील 24 तासांत म्हणजेच बुधवारी दिवसभरात देशात 5,443 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 5 लाख 28 हजार 429 वर पोहोचली. देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सध्या देशात 46 हजार 342 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. आधीच्या दिवशी ही संख्या 46 हजार 216 इतकी होती.


राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईमध्ये


महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत गेल्या 24 तासांत 112 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,28,776 वर पोहोचली आहे. मुंबईत बुधवारी 203 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98.2 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. मुंबईत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 726 इतकी आहे. सध्या मुंबईत 845 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत.  






देशव्यापी लसीकरणात 217 कोटी लसी देण्यात आल्या


देशात कोरोना लसीकरणाअंतर्गत आतापर्यंत एकूण 217 कोटी प्रतिबंधात्मक कोरोना लसी देण्यात आल्या आहेत.






 


महत्त्वाच्या इतर बातम्या


Mumbai Corona Cases : मुंबईत बुधवारी 112 रुग्णांची नोंद, 203 कोरोनामुक्त