Samata Party on Shivsena Symbol : केंद्रीय निवडणूक आयोगानं (Central Election Commission) शिवसेनेतल्या ठाकरे गटाला तात्पुरतं दिलेलं मशाल चिन्हही आता जाणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण समता पक्षानं ठाकरे गटाला अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत मशाल चिन्ह (Mashaal) मिळू नये यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. मशाल हे समता पक्षाचं (Samata Party) निवडणूक चिन्ह असल्याचा या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांचा दावा आहे. दरम्यान, या पक्षाची महाराष्ट्रातली (Maharashtra Politics) मान्यता 2004 सालीच रद्द झाली आहे.
2004 साली राज्यातली मान्यता रद्द झालेला समता पक्ष शिवसेनेच्या मशाल चिन्हाविरोधात आज दिल्ली हायकोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहे. मशाल चिन्ह अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरेंना देऊ नये, अशी समता पक्षाची मागणी आहे. त्यामुळे आता समता पक्षाच्या मागणी दिल्ली हायकोर्ट मान्य करणार की, नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अंधेरीतील पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll Election 2022) ठाकरेंची शिवसेना मशाल चिन्हावर लढणार आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणुकीचं बिगुल वाजलं असून आता प्रचाराला सुरुवातही झाली आहे. पण, ठाकरेंसमोर आता नवं विघ्न येऊन उभं राहिलं आहे. ठाकरेंना निवडणूक आयोगाकडून जे चिन्ह देण्यात आलं आहे. त्या चिन्हावर समता पक्षानं दावा केला आहे. समता पक्षानं आता थेट चिन्हालाच आव्हान दिल्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंच्या अडचणी वाढणार आहेत.
समता पक्षानं मशाला चिन्हाला दिल्ली हायकोर्टात आव्हान देण्याचं ठरवलं आहे. समता पक्ष यावर आज (शनिवार) कोर्टात याचिका दाखल करणार आहे. 2004 मध्ये समता पक्षाची राज्यातली मान्यता काढण्यात आली आहे. त्यानंतर आता शिवसेनेतील फुटीनंतर निवडणूक आयोगानं ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल चिन्हं दिलं आहे. या चिन्हावर ठाकरेंची शिवसेना प्रथमच निवडणूक लढवत असताना समता पक्षानं याच चिन्हावर दावा केल्यानं कोर्टात काय होणार याकडे लक्ष लागलं आहे.
ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर समता पार्टीचा दावा
ठाकरे गटाच्या नव्या पक्षचिन्ह मशालीवर समता पक्षानं दावा केला आहे. 1996 पासून मशाल हे आमचं चिन्ह असल्याचा दावा दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षानं केला आहे. तसंच पक्षानं निवडणूक आयोगातही लेखी तक्रार केली आहे. आता याप्रकरणी समता पक्ष दिल्ली हायकोर्टात दाद मागणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :