Coronavirus Cases Today in India : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी आहे. देशातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या एक हजारांवर पोहोचली आहे, तर नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात गेल्या 24 तासांत 1997 रुग्ण आढळले आहेत. आदल्या दिवसाच्या तुलनेत 503 रुग्णांची संख्या कमी झाली आहे. देशात काल 2500 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. इतकंच नाही तर मे महिन्यानंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्या दोन हजारांच्या खाली पोहोचली आहे. या आधी 23 मे 2022 रोजी 1675 कोरोनाबाधितांची नोंद झाली होती.
देशात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू
देशातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येतही सुमारे दोन हजार रुग्णांची मोठी घट झाली आहे. देशात सध्या 30 हजार 362 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. काल ही संख्या 32 हजार 282 इतकी होती. गेल्या 24 तासांत नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील कोरोनाबळींचा एकूण आकडा 5 लाख 28 हजार 754 वर पोहोचला आहे. आतापर्यंत देशात 4 कोटी 46 लाख 6 हजार 460 रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
महाराष्ट्रातील मुंबईत सर्वाधिक रुग्ण
गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 198 नवीन रुग्ण आढळले असून एका कोरोनाबाधिताचा मृत्यू देखील झाला आहे. सर्वाधिक 80 रुग्ण मुंबईत आढळले असून याशिवाय 328 जण कोरोनामुक्त देखील झाले आहेत. आतापर्यंत एकूण 79 लाख 72 हजार 580 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 80 रुग्ण मुंबईत आढळले आहेत.
देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती
- आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात मागील 24 तासांत 198 नवीन रुग्ण आढळले असून एका कोरोनाबाधिताचा मृत्यू देखील झाला आहे. तर 328 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
- राजधानी दिल्लीत गुरुवारी 57 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर दिल्लीत 2.19 टक्के पॉझिटिव्हीटी रेट आहे.
- मध्य प्रदेशात गेल्या 24 तासांत 11 नवीन रुग्ण आढळले आहेत. या राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या गुरुवारी 10 लाख 54 हजार 396 वर पोहोचली आहे.
- छत्तीसगडमध्ये गुरुवारी दिवसभरात 36 कोरोनाबाधित आढळले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगडमध्ये आतापर्यंत एकूण 14 हजार 137 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात 11 लाख 76 हजार 533 रुग्णांना कोरोना संसर्ग झाला आहे.
- तामिळनाडूमध्ये 404 नवीन कोरोना रुग्णांचीनोंद झाली, ज्यामुळे आत्तापर्यंतची कोरोनाबाधितांची संख्या 35 लाख 85 हजार 831 इतकी झाली आहे. तामिळनाडूमध्ये आतापर्यंत 38,047 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
- आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी 69 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या