Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्ग घटला असला, तरी कोरोनाचा धोका मात्र कायम आहे. एकीकडे कोरोना संसर्गात घट होत असताना दुसरीकडे कोरोनाच्या पाचव्या लाटेचा धोका व्यक्त केला जात आहे. बदलत्या वातावरणामुळे कमी झालेली प्रतिकारशक्ती आणि कोरोनाच्या सबव्हेरियंटच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाच्या संभाव्य लाटेचा धोका व्यक्त केला जात आहे. दरम्यान देशात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. केंद्रीय आरोग्य आकडेवारीनुसार, देशात देशात एक हजार 321 नवीन रुग्ण आणि नऊ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
देशात 1321 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यासोबतच देशातील कोरोना संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या चार कोटी 46 लाख 57 हजार 149 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत देशात 5 लाख 30 हजार 461 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांमध्येही घट झाली आहे. सध्या देशात 16 हजार 98 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
कोरोनाचा नवजात बालकांवर 'हा' परिणाम
जगभरातील कोरोनाचा संसर्ग कायम आहे. कोरोना विषाणू ( Covid19 ) संदर्भातील आणखी एक धोकादायक बाब समोर आली आहे. कोरोना विषाणूचा लहान मुलांवर खूप वाईट परिणाम दिसत आहे. या विषाणूमुळे मुलांच्या संवाद कौशल्यावर ( Communication Skill ) परिणाम झाल्याचं आढळून आलं आहे. संशोधनात आढळलं की, कोरोना काळात जन्मलेल्या बाळामध्ये मज्जासंस्थेचा विकास संथपणे झाला. मुळे त्यांची बोलण्याची क्षमता आणि हालचाल करण्याची क्षमता त्यांच्या वयातील इतर मुलांच्या तुलनेने कमी होती.
कोरोना हवेतून पसरतो, WHO कडून मान्य
कोरोना विषाणू ( Sars CoV 2 ) हा हवेतून पसरतो, हे जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) मान्य केलं आहे. कोरोना विषाणू ( Covid 19) हा प्रामुख्याने वॉटर ड्रॉपलेट्सद्वारे पसरतो, असं मानलं जात होतं. पण आता कोरोना विषाणू हवेतून पसरतो, यावर जागतिक आरोग्य संघटनेनंही शिक्कामोर्तब केला आहे. एका संशोधनातून समोर आलेल्या अहवालात हे स्पष्ट झालं आहे.