Gujarat Assembly Election 2022 : गुजरातमध्ये (Gujrat) होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तारखा आज दुपारी 12 वाजता जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची (Election Commission of India) पत्रकार परिषद आज दुपारी बारा वाजता होणार आहे. याच पत्रकार परिषदेत (Press Conferance) निवडणूक आयोगाकडून गुजरात विधानसभा निवडणुका जाहीर होऊ शकतात. दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजप (BJP) आणि काँग्रेसनं (Congress) आतापासूनच कंबर कसली आहे. तसेच, यंदा गुजरातची निवडणूक लढवणार असल्याचं आम आदमी पक्षानं (Aam Aadmi Party) जाहीर केल्यामुळं यंदाची निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे. 


गुजरातमध्ये गेल्यावेळीप्रमाणेच यंदाही दोन टप्प्यांत निवडणुका होऊ शकतात. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान होऊ शकतं. 2 डिसेंबरला पहिल्या टप्प्यासाठी आणि 5 किंवा 6 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होऊ शकतं. निवडणूक आयोगानं यापूर्वीच हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषण केली आहे. हिमाचल प्रदेशात 12 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. 


निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच आपकडून उमेदवारांची यादी जाहीर


गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने (आप) मंगळवारी 22 उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली. पक्षाने आतापर्यंत 108 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. AAP हा एकमेव राजकीय पक्ष आहे ज्याने गुजरात निवडणुकीसाठी 100 हून अधिक उमेदवारांची घोषणा केली आहे. गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागा आहेत.


2017 मध्ये भाजप बहुमतात 


2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सर्व 182 जागांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपनं 99 जागांसह बहुमताचा आकडा पार केला होता. तर काँग्रेसला 80 जागा मिळाल्या होत्या. दोघांमध्ये फरक पाहिला तर केवळ 19 जागांचा फरक होता. त्यामुळे 2017 मध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटें की टक्कर झाली होती, असंही म्हणता येईल. 2017 मध्ये, गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान पार पडलं होतं. गुजरातमध्ये बहुमताचा आकडा 92 आहे. 2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी झालेल्या मतदानात 66.75 टक्के मतदान झालं होतं. तर, दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी 68.70 टक्के मतदान झालं होतं.