Coronavirus Cases Today in India : एकीकडे एप्रिल महिन्यापासून देशातील कोरोना संसर्ग कमी होत आहे, असं दिसताना अचानक कोरोना संसर्गात सातत्याने वाढ होत आहे. देशात गेल्या 24 तासांत 4 हजार 518 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मार्चनंतरची ही सर्वाधिक रुग्ण वाढ नोंदवण्यात आली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 25 हजारांच्या पुढे गेली आहे. सध्या देशात 25 हजार 782 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. तसेच रविवारी दिवसभरात 2779 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. ही तीन महिन्यांतील एका आठवड्यामध्ये नोंद झालेली सर्वाधिक संख्या आहे. दरम्यान, कोरोना मृतांची संख्या कमी झाली आहे.


देशात सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात आणि केरळ आहेत. दरम्यान, 10 राज्यांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. भारतात रविवारी 4518 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी देशात 4270 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. गेल्या काही दिवसांमध्ये कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारनं बंदिस्त ठिकाणी मास्क वापरणं अनिवार्य केलं असून सार्वजनिक ठिकाणीही मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


देशात कोरोनाची चौथी लाट येण्याचा धोका आरोग्य तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. दिल्लीत रविवारी 1.91 टक्के पॉझिटिव्ह दरासह 343 नवीन कोरोना प्रकरणं नोंदवली गेली आहेत. कर्नाटकात रविवारी 301 नवीन रुग्ण आढळले आहेत.






रविवारी महाराष्ट्रात 1494 कोरोना रुग्णांची नोंद


महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 1 हजार 494 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारी 614 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 77 लाख 38 हजार 564 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.04% एवढे झाले आहे. राज्यात आज 1494 नवीन रुग्णांचे निदान झालेय. तर एका रुग्णाचा मृत्यू झालाय. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्के एवढा आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या सहा हजार 767 इतकी झाली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या