Coronavirus India Cases : देशात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरणीला लागला असला तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मात्र अद्याप कमी झालेला नाही. आताही देशात दररोज सव्वा लाखाहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 1 लाख 34 हजार 154 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 2887 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2 लाख 11 हजार 499 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी मंगळवारी देशात 1 लाख 32 हजार 788 लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर 3207 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 


आज देशात सलग 21व्या दिवशी कोरोनाची लागण झालेल्यांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. 2 जूनपर्यंत देशात 22 कोटी 10 लाख 43 हजार 693 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 24 लाख 26 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 35 कोटी 37 हून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 21.59 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 6 टक्क्यांहून अधिक आहे. 


देशातील आजची कोरोना स्थिती


एकूण कोरोनाबाधित : दोन कोटी 84 लाख 41 हजार 986
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 63 लाख 90 हजार 584
सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : 17 लाख 13 हजार 413
मृतांचा एकूण आकडा : 3 लाख 37 हजार 989


देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.18 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 92 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन रुग्णसंख्या 7 टक्क्यांनी कमी झाली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत जगभरात दुसऱ्या स्थानी आहे. एकूण बाधितांच्या संख्येतही भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. तर जगात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. 


Maharashtra Corona Cases : काल राज्यात 29,270 रुग्ण बरे होऊन घरी तर 15,169 नव्या रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 94.54 टक्क्यांवर


राज्यात काल (बुधवारी) तर 15,169 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 29,270 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल 285 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काल आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट आहे. राज्यात काल एकूण 2,16,016 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  


आजपर्यंत एकूण 54,60,589 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.54% टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल 285 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.67 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,55,14,594 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57,76,184 (16.26 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 16,87,643 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 7,418 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 925 कोरोनाबाधितांची नोंद


मुंबईत गेल्या 24 तासात 925 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1632 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 674296 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील  एकूण सक्रिय रुग्णसंख्या सध्या 16580 इतकी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 477 दिवसांवर पोहोचला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :