नवी दिल्ली : देशातील कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढल्याचं दिसून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 1,32,788 रुग्णांची भर पडली असून 3207 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 2,31,456 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल एकाच दिवसात 1,01, 875 सक्रिय रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्या आधी सोमवारी देशात 1.27 लाख नव्या रुग्णांची भर पडली होती तर 2795 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 


देशात आतापर्यंत एकूण 21 कोटी 85 लाख 46 हजार 667 कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत तर 35 कोटींहून जास्त कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. 


देशातील आजची एकूण कोरोना आकडेवारी 



  • एकूण कोरोना रुग्ण - दोन कोटी 83 लाख सात हजार 832

  • कोरोना मुक्त झालेले रुग्ण - दोन कोटी 61 लाख 79 हजार

  • एकूण सक्रिय रुग्ण - 17 लाख 93 हजार 645 

  • एकूण मृत्यू - 3 लाख 35 हजार 102


देशातील कोरोनाचा मृत्यूदर हा 1.18 टक्के आहे तर रिकव्हरी दर हा 92 टक्के इतका आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या 50 टक्क्यांनी घटली आहे. दर दिवशी रुग्णसंख्येत 1.3 लाखांची घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मागील आठवड्याभरापासून रुग्णसंख्या सातत्यानं घटत आहे आणि ही अतिशय सकारात्मक बाब आहे. देशाचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे आता 92 टक्क्यांवर पोहोचलं असून, दर आठवडयाला तब्बल 20 लाख कोरोना चाचण्या होत असल्याची माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे. 


राज्यात मंगळवारी 14 हजार 123 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 34 हजार 949 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता राज्याचा रिकव्हरी रेट 94.28 टक्क्यांवर पोहचला आहे. याआधी 10 मार्च रोजी 13 हजार 659 रुग्णांची नोंद झाली होती.  


दरम्यान, मंगळवारी 477 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के झाले आहे. राज्यात सध्या 2 लाख 30 हजार 681 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात 54 लाख 31 हजार 319 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 96 हजार 198 रुग्णांना आतापर्यंत जीव गमावला आहे. 


महत्वाच्या बातम्या :