Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 3 हजार 116 नवीन रुग्ण आढळले असून 47 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर मात केल्याने शनिवारी 5 हजार 559 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.


सक्रिय प्रकरणांची संख्या 38 हजार 69 इतकी कमी 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी दिवसभरात देशात 5 हजार 559 लोक बरे झाले होते. यामुळे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 38 हजार 69 इतकी झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 15 हजार 850 झाली आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 37 हजार 72 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.


आतापर्यंत 180 कोटींहून अधिक डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 180 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. शनिवारी दिवसभरात 20 लाख 31 हजार 275 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत लसीचे 180 कोटी 13 लाख 23 हजार 547 डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहिती नुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दोन कोटींहून अधिक (2,12,38,712) कोरोना लसी देण्यात आल्या आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha