Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्ग कमी झाल्याचं आढळून आलं आहे. कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 2568 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 19 हजार 137 वर पोहोचली आहे. काल देशात 3157 नवीन कोरोनाबाधितांची नोंद आणि 50 जणांचा मृत्यू झाला. देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे जाणून घ्या.


देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 137
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 137 इतकी झाली आहे. सोमवारी दिवसभरात देशात 2911 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 41 हजार 887 जण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 20 कोरोनोरुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 23 हजार 889 झाली आहे. देशातील कोरोना संसर्गाचा दैनंदिन दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. सोमवारी दिवसभरात देशात 4 लाख 19 हजार 552 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. 


आतापर्यंत 189 कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या
देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत 189 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. सोमवारी दिवसभरात 16 लाख 23 हजार 795 कोरोना लसी देण्यात आल्या आहेत. देशात आतापर्यंत 189 कोटी 41 लाख 68 हजार 295 कोरोना लसी देण्यात आल्या आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या