Coronavirus Cases Today in India : जगभरासह देशातील कोरोना संसर्ग अद्यापही कायम आहे. देशात कोरोनाच्या सबव्हेरियंटसह कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. देशात एक हजार 604 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात काल 1574 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तर गेल्या 24 तासांत देशात आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून काल ही संख्या 19 इतकी होती. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली असली, तरी कोरोना विषाणूमुळे होणारं मृत्यूचं प्रमाण घटलं आहे.


देशात सध्या 18 हजारहून अधिक उपचाराधीन रुग्ण आहेत. देशात गेल्या 24 तासांत दोन हजार 81 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनातून बरे झालेल्यांची एकूण संख्या 4 कोटी 41 लाख 4 हजार 933 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 1,604 नवीन कोरोनाबाधित आणि आठ कोरोनाबळींची नोंद झाली आहे. भारतात सध्या 18 हजार 317 सक्रिय कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.


महाराष्ट्रात XBB व्हेरियंटच्या 36 रुग्णांची नोंद


महाराष्ट्रात आज कोरोनाच्या 319 नव्या रुग्णांची नोंद (Maharashtra Corona Update) झाली असून 406 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या नवीन एक्सबीबी व्हेरियंटचे (Covid-19 XBB sub-variant) एकूण 36 रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातील आहेत.






 


देशात लसीचे एकूण 219.63 डोस (95.02 कोटी दुसरा डोस आणि 22.08 कोटी बूस्टर डोस) देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 1 लाख 39 हजार 111 डोस देण्यात आले आहेत. भारतातील सक्रिय रुग्णांचं प्रमाण 0.04 टक्के आहे. दैनिक सकारात्मकता दर 1.02 टक्के आणि साप्ताहिक सकारात्मकता दर 1.08 टक्के इतका आहे.






कोविड-19 हवेतून पसरतो


जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलं आहे की, कोविड 19 हा कोरोना विषाणू ( Sars CoV 2 ) हा हवेतून पसरतो. कोविड 19 ( Covid 19) हा प्रामुख्याने वॉटर ड्रॉपलेट्सद्वारे पसरतो, असं मानलं जात होतं. एखादी जवळची व्यक्ती तुमच्यासोबत संपर्कादरम्यान खोकल्यामुळे, शिंकण्यामुळे किंवा बोलताना नकळत बाहेर पडणाऱ्या थुंकीद्वारे कोरोना विषाणू पसरतो, असं आतापर्यंत मानलं जातं होतं. पण आता एका संशोधनातून समोर आलेल्या अहवालानुसार, कोरोना विषाणू हवेतून पसरतो, यावर जागतिक आरोग्य संघटनेनंही शिक्कामोर्तब केला आहे.