मुंबई : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मागील 24 तासात 7 हजार 466 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर 175 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 65 हजार 799 झाली आहे. त्यापैकी 4 हजार 706 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 71  हजार 105 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासात 3 हजार 313 कोराना रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 42.88 टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण 89 हजार 987 आहेत.


देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहेत.राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 47 हजार 190 झाला आहे. त्यातील 13 हजार 404 बरे झाले आहेत. रिकव्हरी रेट 28.18 टक्के आहे. तर राज्यात आतापर्यंत 1 हजार 577 जण मृत्यूमुखी पडले आहेत. मुंबईत 28 हजार 817 कोरोनाबाधित आढळले आहेत त्यातील 949 जणांचा बळी गेले आहेत.

महाराष्ट्रात काल 2 हजार 598 कोरोनाबाधितांची वाढ झाली, तर 698 रुग्ण बरे झाले. दिवसभरात सर्वाधिक 105 लोकांचा बळी गेला. राज्यात आता कोरोनाबाधितांचा आकडा 59 हजार 546 झाला आहे. त्यातील 18 हजार 616 बरे झाले. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण  38 हजार 939 आहेत. तर राज्यातला मृतांचा आकडा 1982 वर पोहोचला. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आहे 31.26 टक्के आहेत. मुंबईत 35 हजार 485 कोरोनाबाधित आहेत त्यातील 1135 लोकांचा मृत्यू झाला आहे.

केरळमध्ये 1088 रुग्ण त्यातील 555 बरे झाले झाले आहेत. यातले 7 जण मृत पावले आहेत. केरळचा रिकव्हरी रेट 51.01 टक्के आहे. गेल्या पंधरा दिवसात केरळमध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढतेय त्यामुळे रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवरुन 51 टक्क्यांवर आला आहे.


महाराष्ट्राखालोखाल महत्वाची टॉप सात राज्य 


तामिळनाडू 19372 रुग्ण, 10548 बरे झाले, मृतांचा आकडा 145 , रिकव्हरी रेट  54.44 टक्के


दिल्ली  16281 रुग्ण, 7495 बरे झाले, मृतांचा आकडा 316, रिकव्हरी रेट  46.03 टक्के


गुजरात  15562 रुग्ण, 8003 बरे झाले,  मृतांचा आकडा 960, रिकव्हरी रेट  51.42 टक्के


राजस्थान  8067 रुग्ण, 4817 बरे झाले, मृतांचा आकडा 180, रिकव्हरी रेट  59.71 टक्के


मध्यप्रदेश 7453 रुग्ण, 4050 बरे झाले, मृतांचा आकडा 321, रिकव्हरी रेट  54.34 टक्के


उत्तरप्रदेश 7110 रुग्ण, 4215 बरे झाले, मृतांचा आकडा 194, रिकव्हरी रेट 58.28 टक्के


पश्चिम बंगाल 4536 रुग्ण, 1668 बरे झाले , मृतांचा आकडा 295, रिकव्हरी रेट  36.77 टक्के


जगभरात कोरोनाचे जवळपास 59 लाख रुग्ण 

जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे जवळपास 59 लाख रुग्ण झाले आहेत. मागील 24 तासात जगातील 213 देशांमध्ये  एक लाख 16 हजार नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर 24 तासात 4,612 जणांचा बळी कोरोनामुळं गेला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 5,906,202 लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या  3 लाख 61 हजार 549 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 25 लाख 77 हजार रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 74 टक्के कोरोनाबाधित हे केवळ बारा देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 43 लाखांच्या घरात आहे.

कोणत्या देशात किती कोरोनाबाधित

  • अमेरिका: कोरोनाबाधित- 1,768,461, मृत्यू- 103,330

  • ब्राझील: कोरोनाबाधित- 438,812, मृत्यू- 26,764

  • रशिया: कोरोनाबाधित- 379,051, मृत्यू- 4,142

  • स्पेन: कोरोनाबाधित- 284,986, मृत्यू- 27,119

  • यूके: कोरोनाबाधित- 269,127, मृत्यू- 37,837

  • इटली: कोरोनाबाधित- 231,732, मृत्यू- 33,142

  • फ्रांस: कोरोनाबाधित- 186,238, मृत्यू- 28,662

  • जर्मनी: कोरोनाबाधित- 182,452, मृत्यू- 8,570

  • भारत: कोरोनाबाधित- 165,386, मृत्यू- 4,711

  • टर्की: कोरोनाबाधित - 160,979, मृत्यू- 4,461