मुंबई : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मागील 24 तासात 6 हजार 88 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर 148 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 18 हजार 447 झाली आहे. त्यापैकी 3 हजार 583 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 हजार 534 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच देशाचा रिकव्हरी रेट 40.97 टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण   66 हजार 303 आहेत.

देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात काल 2345 कोरोनाबाधितांची वाढ झाली. दिलासादायक म्हणजे 1408 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 41 हजार 642 झाला आहे. त्यातील 11  हजार 726 बरे झाले आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 28.15 टक्के आहे. तर राज्यात आतापर्यंत 1 हजार 454 जण मृत्यूमुखी पडले आहेत. यापैकी मुंबईत 25 हजार 500 कोरोनाबाधित सापडले आहेत त्यातील 882 जणांचा बळी गेले आहेत.

 विविध राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या


 केरळमध्ये 690 रुग्ण त्यातील 510 बरे झाले , 4  मृत, रिकव्हरी रेट 73.91 टक्के. गेल्या दहा दिवसात केरळमध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढतेय त्यामुळे रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवरुन 73 टक्क्यांवर आला आहे.


 तामिळनाडू 13967 रुग्ण,  6282 बरे झाले, मृतांचा आकडा 94, रिकव्हरी रेट  44.97 टक्के


गुजरात  12905 रुग्ण, 5488 बरे झाले,  मृतांचा आकडा 773 , रिकव्हरी रेट  45.52 टक्के


दिल्ली  11659 रुग्ण, 5567 बरे झाले, मृतांचा आकडा 194, रिकव्हरी रेट  47.74 टक्के


राजस्थान  6227 रुग्ण, 3485 बरे झाले, मृतांचा आकडा 151, रिकव्हरी रेट  55.96 टक्के


मध्यप्रदेश 5981 रुग्ण, 2843 बरे झाले, मृतांचा आकडा 270, रिकव्हरी रेट  47.53 टक्के


पश्चिम बंगाल 3197 रुग्ण, 1193 बरे झाले , मृतांचा आकडा 259 , रिकव्हरी रेट  37.31 टक्के


जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 52 लाखांच्या जवळ


जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे जवळपास  52 लाख रुग्ण झाले आहेत. मागील 24 तासात जगातील 213 देशांमध्ये 105,766  नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर कोरोनामुळं 4,833 बळी गेले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 5,194,099 लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 3 लाख 34 हजार 072  वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 20 लाख 78 हजार 536 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 75 टक्के कोरोनाबाधित हे केवळ बारा देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 39 लाखांच्या घरात आहे.

कोणत्या देशात किती कोरोनाबाधित

  • अमेरिका: कोरोनाबाधित- 1,620,457, मृत्यू- 96,295

  • रशिया: कोरोनाबाधित- 317,554, मृत्यू- 3,099

  • ब्राझील: कोरोनाबाधित- 310,087, मृत्यू- 20,047

  • स्पेन: कोरोनाबाधित- 280,117, मृत्यू- 27,940

  • यूके: कोरोनाबाधित- 250,908, मृत्यू- 36,042

  • इटली: कोरोनाबाधित- 228,006, मृत्यू- 32,486

  • फ्रांस: कोरोनाबाधित- 181,826, मृत्यू- 28,215

  • जर्मनी: कोरोनाबाधित- 179,021, मृत्यू- 8,309

  • टर्की: कोरोनाबाधित- 153,548, मृत्यू- 4,249

  • इरान: कोरोनाबाधित- 129,341, मृत्यू- 7,249