मुंबई: देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मागील 24 तासात 5 हजार 609 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर 132 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 12 हजार 359 झाली आहे. त्यापैकी 3 हजार 435 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 45 हजार 300 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच देशाचा रिकव्हरी रेट 40.31 टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण  63 हजार 624 आहेत.

देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहेत. राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 39 हजार 297 झाला आहे. त्यातील 10  हजार 318 बरे झाले आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 26.25 टक्के आहे. तर राज्यात आतापर्यंत 1 हजार 390 जण मृत्यूमुखी पडले आहेत. यापैकी मुंबईत 24 हजार 118 कोरोनाबाधित सापडले आहेत त्यातील 841 जणांचा बळी गेले आहेत.

1 जूनपासून सुरु होणाऱ्या रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगला आजपासून सुरुवात


विविध राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या

केरळमध्ये 666 रुग्ण त्यातील 502 बरे झाले , 4मृत, रिकव्हरी रेट 75.37 टक्के. गेल्या दहा दिवसात केरळमध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढतेय त्यामुळे रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांवर आला आहे.


तामिळनाडू 13191 रुग्ण,  5882 बरे झाले, मृतांचा आकडा 87, रिकव्हरी रेट  44.59 टक्के


गुजरात  12537 रुग्ण, 5219 बरे झाले,  मृतांचा आकडा 749, रिकव्हरी रेट  41.62टक्के


दिल्ली  11088 रुग्ण, 5192 बरे झाले, मृतांचा आकडा 176, रिकव्हरी रेट  46.82 टक्के


राजस्थान  6015 रुग्ण, 3403 बरे झाले, मृतांचा आकडा 147, रिकव्हरी रेट  56.57 टक्के


मध्यप्रदेश 5735 रुग्ण, 2733 बरे झाले, मृतांचा आकडा 267, रिकव्हरी रेट  47.65 टक्के


पश्चिम बंगाल 3103 रुग्ण, 1136 बरे झाले , मृतांचा आकडा 253, रिकव्हरी रेट  36.60 टक्के


जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 51 लाखांच्या जवळ


जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे जवळपास 51 लाख रुग्ण झाले आहेत. मागील 24 तासात जगातील 213 देशांमध्ये 99,685 नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर कोरोनामुळं 4,738 बळी गेले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 3 लाख 29 हजार 292 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 20 लाख 20 हजार 151 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 75 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत.


जगात कोणत्या देशात किती कोरोनाबाधित




  • अमेरिका: कोरोनाबाधित- 1,591,953, मृत्यू- 94,992

  • रशिया: कोरोनाबाधित- 308,705, मृत्यू- 2,972

  • ब्राझील: कोरोनाबाधित- 293,357, मृत्यू- 18,894

  • स्पेन: कोरोनाबाधित- 279,524, मृत्यू- 27,888

  • यूके: कोरोनाबाधित- 248,293, मृत्यू- 35,704

  • इटली: कोरोनाबाधित- 227,364, मृत्यू- 32,330

  • फ्रांस: कोरोनाबाधित- 181,575, मृत्यू- 28,132

  • जर्मनी: कोरोनाबाधित- 178,531, मृत्यू- 8,270

  • टर्की: कोरोनाबाधित- 152,587, मृत्यू- 4,222

  • इरान: कोरोनाबाधित - 126,949, मृत्यू- 7,183