Vava Suresh Health Updates: भारतात स्नेक कॅचर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळचा सर्पमित्र  वावा सुरेशला कोब्रानं दंश केलाय. सध्या त्याच्यावर कोट्टायम येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वावा सुरेश आता व्हेंटिलेटरवर असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती एएनआय वृत संस्थेनं दिली आहे. आता त्यांचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके सामान्य आहेत, अशी माहिती रुग्णालच्याचे अधिक्षक डॉ. जयकुमार टीके यांनी दिलीय. सुरेश हे प्रसिद्ध वन्यजीव संरक्षक आहेत. वावा सुरेश यांनी आतापर्यंत 50,000 हून अधिक साप पकडले आहेत. 


वावा सुरेश हा सोमवारी कोट्टायम जवळील कुरिची ग्रामपंचायतीमधील एका घरात सुरेश कोब्रा पकडण्यासाठी गेला होता. त्यावेळी कोब्रानं त्याला दंश केला होता. त्यानंतर त्याला तातडीनं कोट्टायमच्या गांधीनगर येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्याला अॅन्टी वेनम देण्यात आलय आणि त्यानंतर त्याच्यावर विशेष उपचार सुरु केला. 18 तासानंतर त्याच्याप्रकृतीत सुधारणा होताना दिसत आहे. सध्या ते व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यावर औषधांचा परिणाम होत आहे. रुग्णालयाचे अधिक्षक म्हणाले की, वावा सुरेश यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आहे. त्यांचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके सामन्य आहेत. सध्या डॉक्टर त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. सुरेशच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे. 


एएनआयचे ट्वीट-



व्हिडिओ- 



याआधीही वावा सुरेशला अनेकदा सापांनी दंश केला आहे. 2020 मध्ये त्याला पिट व्हायपर सापानं दंश केला होता. आतापर्यंत 3 हजार 500 अधिक सापांनी चावा घेतलाय. त्यापैकी 350 हून अधिक विषारी आणि धोकादायक स्वरूपाचे होते. केरळ हे विशेषत: सापांच्या 110 प्रजातींचं घर म्हणूनही ओळखलं जातं. सुरेश यांनी जवळपास सर्व प्रजातींचे साप पकडले आहेत. 



हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha