Coronavirus In India: जगासह देशाचीही धाकधूक पुन्हा एकदा कोरोनानं (Coronavirus) वाढवली आहे. काल दिवसभरात देशात 157 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत देशात एकूण 4,46,77,459 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या घटून 3,421 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या देशात 3,421 रुग्ण उपचार घेत आहेत. याची सरासरी टक्केवारी एकूण रुग्णांच्या 0.01 टक्के इतकी आहे.


काल दिवसभरात 50 हजार तपासण्या 


गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णांच्या संख्येत सात रुग्णांची घट झाली आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.80 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर दैनिक संसर्ग दर 0.32 टक्के इतका आहे, एवढंच नाहीतर साप्ताहिक संसर्ग दर 0.18 टक्के इतका आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोविड-19 साठी 49,464 नमुने तपासण्यात आले आहेत. देशात आतापर्यंत एकूण 4,41,43,342 लोक कोरोनामुक्त झाले आहेत, तर कोविड-19 मुळे मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के इतके आहे.


'या' राज्यांमध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढला 


महाराष्ट्र (Maharashtra), राजस्थान (Rajasthan), पंजाब (Punjab), दिल्ली (Delhi) आणि हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) तसेच तेलंगणा (Telangana) आणि पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) कोरोना प्रादुर्भावात किंचित वाढ झाली आहे. 


'या' राज्यांमध्ये साप्ताहिक कोरोना बाधितांमध्ये वाढ 


या आठवड्यात, 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना बाधितांच्या साप्ताहिक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. नऊ राज्यांमधील प्रकरणं गेल्या आठवड्याप्रमाणेच समान पातळीवर राहिली, तर इतर 11 राज्यांमध्ये या आठवड्यात कमी प्रकरणं नोंदवली गेली. ज्या राज्यांमध्ये प्रकरणं वाढली आहेत. त्यापैकी फक्त राजस्थान आणि पंजाबमध्ये 30-30 पेक्षा जास्त रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तर, दुसरीकडे, केरळमध्ये 31 रुग्णांमध्ये घट झाली आहे.


नाकावाटे देण्यात येणारी कोरोना लसीची किंमत निश्चित


चीन, जपान, अमेरिका सारख्या देशांमध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता  केंद्र सरकार सध्या अलर्ट मोडवर आहे. गेल्या आठवड्यात परवानागी देण्यात आलेली भारत बायोटेकची (Bharat Biotech) नाकावाटे देण्यात येणारी लशीला गेल्या आठवड्यात परवानगी देण्यात आली असून लवकरच ही लस बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारत बायोटेकची (Bharat Biotech) नाकावाटे देण्यात येणारी लसीची किंमत एक हजार रुपये असणार आहे. यामध्ये लसीची किंमत 800  रुपये  आणि 200 रुपये जीएसटी, रुग्णालयाचे चार्ज असणर आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Corona In India: देशात पुन्हा घोंगावतंय कोरोना संकट! साप्ताहिक कोरोना रुग्णांमध्ये 11 टक्क्यांची वाढ