Corona vaccination in India देशातील वाढत्या कोरोना रुग्णांचा आकडा हा दिवसागणिक आरोग्य यंत्रणांपुढे आणखी अडचणी उभ्या करत आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी काही दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात कोरोना लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली. अनेक नागरिकांनी या लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसादही दिला. पण, आता मात्र हे चित्र बदलताना दिसत आहे. 


महाराष्ट्र, ओडिशा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरम महिमेची गती कमालीच्या फरकानं कमी झालेली आहे. महाराष्ट्रातून वारंवार केंद्राकडे लसीची मागणी करण्यात येत आहे, पण त्यातही काही अडचणी येत असल्यामुळं राज्यातील अनेक लसीकरण केंद्र बंद करावी लागत आहेत. 


Corona Vaccine Shortage LIVE UPDATES | मुंबईतील बीकेसीमधलं जम्बो कोविड लसीकरण केंद्र लसीच्या पुरवठ्याअभावी बंद


महाराष्ट्र- केंद्राकडून राज्याला आतापर्यंत 1 कोटी, 61 लाख 9 हजार 190 लसी देण्यात आल्या. ज्यापैकी 91 लाख 18 हजार 350 लसींचा वापर करण्यात आला आहे. यानंतर आता राज्यात अवघा 14- 15 लाख लसींचाच साठा शिल्लक आहे. त्यामुळं राज्याकडून सातत्यानं केंद्राकडे लसींच्या पुरवठ्याची मागणी करण्यात येत आहे. 


ओडिशा- केंद्र सरकारनं ओडिशाला आतापर्यंत 43 लाख 44 हजार 140 इतक्या संख्येनं लसी पुरवल्या आहेत. यापैकी  37 लाख 87 हजार 520 लसींचा वापर करण्यात आला असून, आता राज्यात 5 लाख 56 हजार 620 इतक्याच लसी शिल्लक आहेत. इथं दर दिवशी जवळपास 72 हजार नागरिकांना लस दिली जात आहे. 


Maharashtra Corona Vaccine Shortage: लस टंचाई; साठा संपल्याने पुन्हा पुरवठा होईपर्यंत नवी मुंबई, पनवेलमध्ये लसीकरण बंद!


मध्य प्रदेश- मध्य प्रदेशातही कोरोनाचा कहल अधिक वेगानं फैलावत असताना केंद्राकडून 58 लाख 19 हजार 530 लसी पुरवण्यात आल्या. ज्यानंतर राज्यात 8 लाख 6 हजार 230 इतक्याच लसी शिल्लक राहिल्या आहेत. 


उत्तर प्रदेश- 92 लाख 9 हजार 330 लसींचा पुरवठा केंद्रानं उत्तर प्रदेशला केला. यापैकी 83 लाख 24 हजार 950 लसींचा वापर करण्यात आला. परिणामी आता इथं, 8 लाख 84 हजार 380 लसी शिल्लक राहिल्या आहेत. दररोज इथं 3 लाख 50 हजार नागरिकांना लस देण्यात येत आहे. 


उत्तराखंड- केंद्र सरकारकडून उत्तराखंडला आतापर्यंत 13 लाख 36 हजार 100 लसी देण्यात आल्या. ज्यापैकी, 11 लाख 66 हजार 930 लसींचा वापर इथं केला गेला. सध्या राज्यात लसींचा साठा जवळपास संपणयाच्या दिशेनं वाटचाल करु लागला आहे. 


राज्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा साठा शिल्लक असला, तरीही काही लसीकरण केंद्रावरील साठा मात्र पूर्णपणे संपलाच आहे, ज्यामुळं लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना लसीअभावी परत पाठवावं लागल आहेत.