Corona Update India : देशात सलग सातव्या दिवशी एक लाखाहून कमी दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 10 लाखांहून कमी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 70,421 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3921 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 19 हजार 501 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यापूर्वी 30 मार्च रोजी सर्वात कमी म्हणजेच, 53,480 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.
देशातील आजची कोरोना स्थिती :
एकूण कोरोना रुग्ण : दोन कोटी 95 लाख 10 हजार 410 एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 81 लाख 62 हजार 947 एकूण सक्रिय रुग्ण : 9 लाख 73 हजार 158एकूण मृत्यू : 3 लाख 74 हजार 305
देशात सलग 32व्या दिवशी कोरोना व्हायरसचे नव्या रुग्णांहून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. 13 जनपर्यंत देशभरात 25 कोटी 48 लाख कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 14 लाख 99 हजार लसीचे डोसे देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत जवळपास 38 कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 14.92 लाख कोरोना सॅम्पल्सची चाचणी करण्यात आली आहे. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 4 टक्क्यांहून अधिक आहे.
रविवारी राज्यात 10,442 नवे रुग्ण तर 7,504 रुग्णांना डिस्चार्ज, 15 जिल्हे आणि शहरात एकही मृत्यू नाही
राज्यात काल 10,442 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 7,504 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल 483 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काल आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या कमी नोंदवण्यात आली आहे. राज्यात काल एकूण 1,55,588 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 15 जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही तर 13 ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आजपर्यंत एकूण 56,39,271 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.48% टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 483 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.88 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,80,46,590 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,08,992 (15.53 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9,62,134 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,160 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.